उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
सोलापूर प्रतिनिधी संतोष दलभंजन

दिनांक 6 डिसेंबर 2025,सोलापूर येथील उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेच्या मार्गदर्शिका दीप्ती शहा, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ, सांस्कृतिक विभाग प्रमुख माधवी खोत यांची उपस्थिती होती. प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रशालेच्या सहशिक्षिका सौ.सारिका महाडिक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी सतत अभ्यासात मग्न राहावे, नेहमी शालेय पुस्तकांबरोबरच अवांतर वाचन करावे,शालेय जीवनात शिस्तीचे महत्व कायद्यासारखे असून विद्यार्थ्यांनी शालेय शिस्तीचे पालन करावे असा संदेश त्यांनी दिला. याप्रसंगी इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी कु.सांची आबुटे, कु.चंचल जेटीथोर, कु. सलोनी भंडारे यांनी आपली सुरेख भाषणे सादर केली. प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र वाचून त्याप्रमाणे आचरण करण्याचा सल्ला दिला.
यावेळी राष्ट्रभाषा हिंदी ऑलिंपियाड परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती वऱ्हाडे तर आभार सोनल आळंद यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकशिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. संविधानाच्या सामूहिक वाचनाने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.


















Leave a Reply