दत्तजयंती व नंदीध्वजाच्या आगमनानिमित्त भाविकांना आस्था सामाजिक संस्थेच्या तर्फे महाप्रसादाचे वाटप
सोलापूर प्रतिनिधी संतोष दलभंजन

सोलापूर दिनांक 4 डिसेंबर रोजी सोलापूर येथील ग्रामदैवत श्री शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त व दत्तजयंती निमित्ताने महादेव गल्ली या ठिकाणी मानाच्या काट्याचे आगमन झाल्यानंतर आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे पालखीसोबत मानाच्या काठीचे आगमन होतात ढोल ,ताशाच्या, गजरात काट्याचे स्वागत करून त्यांची विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर भाविकांना आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने केळी, शाबू, वेफर्स ,बटाटा चिवडा बुंदी लाडू इत्यादी फराळीचे वाटप करण्यात आले.
यावेळी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी, सचिव शिवानंद सावळगी, प्रसिद्ध प्रमुख सुहास छंचुरे, संचालक देविदास चेळेकर, वेदांत तालिकोटी,, पिंटू कस्तुरे, अथर्व शिंदे, अथर्व कोळुरे,वेदांत तमशेट्टी सुरज छंचुरे, उदय छंचुरे यांची उपस्थिती होती.
हा महाप्रसाद अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिराचे मुख्य पुजारी मंदार ( महाराज) पुजारी यांच्या वतीनं महाप्रसाद देण्यात आले.



















Leave a Reply