वैजापूर तालुक्यातील प्रत्येक शाळेला तार कंपाऊंड व प्रत्येक गावात पेव्हर ब्लॉक बसवणार खासदार संदिपान भुमरे यांची ग्वाही
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
आज प्रथमच खासदार संदिपान भुमरे यांचा वैजापूर दौरा होता वैजापूर मधील लक्ष्मीनारायण लॉन्स याठिकाणी भव्य सत्कार समारंभ व आभार दौरा होता वैजापूर तालुक्यात मला सर्वाधिक मते मिळाली वैजापूरकरांनी मला भरभरून मतदान दिलं मी वैजापूरकरांना कधीच विसरणार नाही वैजापूर तालुक्यात आत्तापर्यंत वैजापूरचा विषय आला तर आमदार बोरनारे सरांना विचारा की मी कुठलाच निधी असेल वैजापूरचा कुठलाही प्रश्न असेल मी तो तातडीने सोडवला मी आजही जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आहे मी आज दिल्लीचा सभागृहात आहे मी आमदारकीचा जरी राजीनामा दिला तरी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा शेत रस्त्यांचे प्रश्न असतील ते मी तातडीने सोडवणार अशी ग्वाही वैजापूर येथील कार्यक्रमात संदिपान भुमरे यांनी दिली.आज वैजापूर येथे खासदार पदी विजयी झाल्याबद्दल महायुतीच्या वतीने भव्य सत्कार सोहळा पार पडला. या वेळी विशेष गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी वैजापूर वासियांचे विशेष आभार मानले. जनतेचे एवढे भव्य मिळणारे प्रेम हे भारावून टाकणारे आहे.
यावेळी आमदार रमेश पाटील बोरनारे सर, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, उदयसिंह राजपूत, दिनेश परदेशी – जिल्हा सरचिटणीस, एकनाथ जाधव – माजी जिल्हा अध्यक्ष भाजपा, साबेर भाई – उपनगर अध्यक्ष, बाबासाहेब पाटील जगताप, पंकज ठोंबरे, रामहरी बापू जाधव, भागिनाथ मगर, दीपक राजपूत, पंकज ठोंबरे, अनिल चव्हाण, राजेन्द्र साळुंखे, आनंद निकम, उपसभापती तथा महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.


















Leave a Reply