- पिंपळगाव हरेश्वर : येथील खाजगी सावकारांचा टांगा पलटी घोडे फरार, अवैध सावकारी करणारांना मिळतोय कायद्याचा आधार.
पाचोरा : तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे मागील आठवड्यात पैशासाठी नातवाने आपल्या आई समान आज्जीचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. तसेच या घटनेमागे अवैध सावकारी करणाऱ्या सावकाराकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला होता यामुळे मंजाबाईंचा खुन करण्यात आला असला तरी संबंधित सावकारावर कारवाई न झाल्यामुळे तो आजही बिनधास्तपणे गावात फिरुन इतर लोकांना दिलेल्या पैशाच्या वसूली साठी दमदाटी करत असून त्याने गहाण ठेवलेल्या मोटारसायकल दुसरीकडे लपवून ठेवल्या असल्याने गहाण ठेवलेल्या मोटारसायकल परत मिळवून घेण्यासाठी संबंधित सावकारा विरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगितले जात असल्याने पिंपळगाव हरेश्वर गावातील इतर सावकारांनी सावधगिरी बाळगत त्यांनी सावकारी कर्ज वाटप करतांना गहाण ठेवलेल्या वस्तू व मोटारसायकली दुसरीकडे लपवून ठेवल्या असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे यावरून “खाजगी सावकारांचा टांगा पलटी, घोडे फरार” अशी गत झाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील मंजाबाई भोई हीच्या प्रकरणातील संशयित आरोपी विशाल भोई याने गावातील एका खाजगी अवैध सावकारी करणाऱ्या सावकाराकडून टक्केवारीवर काही रुपये घेतले होते. पैसे देतांना संबंधित सावकाराने विशाल भोई याची दुचाकी गहाण ठेवून घेतली होती. तसेच विशाल भोई याने दरमहा ४०% टक्के व्याजदराने पैसे उसनवारीने घेतले होते म्हणून संबंधित सावकार दर आठवड्याला ठराविक रक्कम वसूल करुन घेत होता.परंतु अक्षयतृतीया सणानिमित्त विशाल भोई हा जुगारात पैसे हरल्यावर तो संबंधित सावकाराकडून घेतलेले पैसे वेळेवर परत देऊ शकला नाही म्हणून संबंधित सावकाराने विशाल भोई याला माझे पैसे दे नाहीतर तुझी गाडी विकून टाकेल अशी धमकी दिली होती. या धमकीला घाबरुन विशाल भोई याने मयत मंजाबाई भोई हिच्याकडे पोशाची मागणी केली होती. मात्र मयत मंजाबाई हीने पैसे देण्यास नकार दिला होता एकाबाजूला सावकाराकडून कर्ज वसुलीसाठी तगादा तर दुसरीकडे मयत मंजाबाई भोई हीच्या कडून पैसे देण्यास नकार या व्दिधा मनस्थितीत सापडलेल्या विशाल भोई याने अगोदर वेढ्यातून झोपेच्या गोळ्या दिल्या या गोळ्यांची मात्रा जास्त झाल्याने मयत मंजाबाई भोई यांना सुस्ती आली असता या संधीचा फायदा घेत संशयित आरोपी विशाल भोई याने मंजाबाईचा गळा दाबून खून केल्याची घटना 77-उघडकीस आली असून याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.तसेच ही घटना उघडकीस आल्यानंतर पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या दोन तासात मयत मंजाबाई भोई हीच्या बहिणीच्या मुलीच्या मुलीचा संशयित म्हणून ताब्यात घेतले असता त्याने मंजाबाई भोई हिला का मारले याबाबत सविस्तर माहिती देत मीच खुन केला असल्याची कबुली दिली होती. म्हणून त्याला ताब्यात घेऊन पाचोरा न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत पिंपळगाव हरेश्वर पोलीसांना चांगले यश मिळाले आहे.असे असले तरी मात्र जनमानसातून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी विशाल भोई याने ज्या औषध दुकानातून झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या त्या औषध विक्रेत्यांने डॉक्टरांची औषध लिहिलेली चिठ्ठी (Prescription) नसतांनाही इतक्या मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या दिल्याच कशा याची सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित औषध विकेत्याला ताब्यात घेतलेले नाही. तसेच घटना उघडकीस आल्यापासून संबंधित औषध विक्रेता दुकानाला कुलुप लावुन फरार झाला आहे अशी माहिती समोर येत असल्याने औषध विक्रेत्यावरचा संशय7बळावला आहे.
तसेच ज्या खाजगी परत5य् संशयित आरोपी 7त् विशाल भोई याने व्याजाने पैसे घेतले होते व त्याने लावलेल्या तगाद्यामुळे विशाल भोई याने मंजाबाई भोई हिचा खुन करुन अंगावरील सोन्या, चांदीचे दागिने काढून घेत ते दागिने अजिंठा येथील सोनाराकडे जाऊन विकून पैसे आणून ते पैसे संबंधित सावकाराला परत केले होते अशी माहिती समोर येत असूनही चोरीचे दागिने विकत घेणारा सोनार व दागिन्यांचे पैसे आल्यावर त्याने संबंधित सावकाराला दिलेले पैसे पोलीसांनी संबंधित सावकाराकडून परत घेतले असले तरी संबंधित सावकाराला अटक करुन त्याच्यावर गुन्हा दाखल न करता त्याला सोडून देण्यात आले आहे. वास्तविक पाहता जर का सावकाराकडून विशाल भोई याच्यामागे पैसे वसुलीसाठी तगादा लावला नसता तर विशाल भोई याने तणावाखाली येऊन निष्पाप आजीचा जीव घेतला नसता परंतु आजही संबंधित सावकाराला अटक केली गेली नसल्याने तो मोकाट फिरत असून त्याने गावात मोठ्या प्रमाणात अवैध सावकारीचे पैसे वाटले आहेत ते पैसे वसुलीसाठी दमदाट्या करत असल्याची चर्चा पिंपळगाव हरेश्वर गावात आहे .कारण संबंधित सावकाराने काही गरजु लोकांना व्याजाने पैसे देतांना काही दुचाकी गहाण ठेवल्या होत्या त्या दुचाकी त्याने आता पिंपळगाव हरेश्वर येथुन जवळच असलेल्या संभाजीनगर जिल्ह्यातील खेड्यापाड्यात पसार केल्याची माहिती समोर येत असून या अवैध सावकारी करणारावर कारवाई झाली नसल्याने त्याला कायद्याच्या रक्षकांकडून एक प्रकारे सुट दिली जात असल्याचा आरोप सुज्ञ नागरिकांनी केला असून या मयत मंजाबाई भोई हीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी याकरिता एक शिष्टमंडळ लवकरच मा. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त…