पाचोरा : बाबाहो झोपलेत? हायवेवरील पथदिवे बंद ठेवून.
पाचोरा शहरातील कॉलेज चौक ते जारगाव चौफुलीपर्यंतची पथदिवे नेहमीप्रमाणे काल दिनांक 19 मे रविवार रोजी देखील बंदच पहावयास मिळाले, यामुळे सुमारे दीड ते दोन किलोमीटर रस्त्यावर भरगच्च अंधार पहावयास मिळत होता, ही पथदिवे बंद ठेवून संबंधित अधिकारी व कर्मचारी पाचोरा शहरात अपघातांना जणू निमंत्रणच देताय की काय असा संतप्त सवाल रहदारीतील प्रवासी व परिसरातील नागरिक विचारत होते. रस्त्यावरील कुत्रे, प्राणी व पाई चालणारा मानव या अपघाताचा बळी पडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. बाबाहो ही पथदिवे बंद चालू करणारे झोपलेत की काय असा देखील प्रश्न उपस्थित होत होता. सदर पथदिवे हे रात्रीच्या वेळेवर सुरू व्हावेत व सकाळी बंद व्हावेत, पथदिवे बंद सुरू करणाऱ्या कर्मचाऱ्यास सक्तीने याबाबत सूचना कराव्यात. अशी मागणी परिसरात जोर धरत आहे. तर या अंधारामुळे चुकून अपघात घडला तर त्यास हायवे प्रशासन जबाबदार असणार का?