वैजापूर तालुक्यातील लाडगाव या ठिकाणाहून मराठा बांधवांसाठी भाकरी व चटणी व्यवस्था गावकऱ्यांनी दोन गाड्या भरून पाठवल्या मुंबईला
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर

मराठा समाजाचे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या विनंतीस मान देऊन सर्व मराठा समाज मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी मराठा समाजास आरक्षण मिळावे याकरिता आझाद मैदान या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहे. आंदोलकाना कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी दोन गाड्या भरून भाकरी व चटणी . मुंबई या ठिकाणी रवाना केली. त्या ठिकाणी अगोदर हॉटेल उघड्या नव्हत्या कुठल्याही प्रकारचे पाण्याची व्यवस्था नव्हती बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई त्यांनीही पाण्याची व्यवस्था केली नव्हती शौचालयाची व्यवस्था केली नाही लाईटची देखील व्यवस्था केली नव्हती .
मराठा समाजाला आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असा इशारा मराठा आंदोलकांनी केला आहे त्यामुळे त्यांची व्यवस्था म्हणून तीनशे किलोमीटर लांब असलेल्या ठिकाणाहून देखील आंदोलकांना भाकरी व चटणी जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. मराठा समाजाने मांडले लाडगावकर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर ग्रामस्थांचे आभार….

















Leave a Reply