प्रतिनिधी -किरण माळी
धरणगाव : श्री. आदिनाथ दिगंबर जैन समाजाच्या वतीने आज रोजी जैन गल्लीतील भगवान अदिनाथ मंदिर पासून श्रीजींची भव्य पालखी मिरवणुक रथातून काढण्यात आली. या दहा दिवसात पर्युषण, तप, त्याग, संयम आणि आत्मशुद्धी उत्सव आनंदी व भावनिक वातावरणात संपन्न झाला.
उत्सव सांगता प्रसंगी श्री. आदिनाथ दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष राहुल जैन म्हणाले की, जैन धर्मानुसार दहा दिवसाचा उत्सवात अनुयायांना आत्मशुद्धीसाठी प्रेरित करतो. तपश्चर्या, उपासना आणि मन शुद्ध करण्यासाठी आवश्यक धार्मिक कार्याच्या आधारित एकाग्रता प्रदान करत असून यांसह ह्या उत्सव पर्वात अहंकार, लोभ, मत्सर, कलह, मतभेद, मनभेद यापासून दूर होऊन धार्मिक उपासना केली जाते. या पर्वात दरदिवशी भाविकगण नित्य नियमाने मंदिर स्थळी अभिषेक, स्वाध्याय व पुजा केली जाते, त्याचप्रमाणे संत-मुनी आणि विद्वानांच्या सानिध्यात स्वाध्याय करण्यात आला. शिवाय आपल्या दैनंदिन कामकाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न या दरम्यान केला जातो. संयम आणि विवेकाचा अभ्यास या पर्वात केला असल्याचे श्री. राहुल जैन यांनी सांगितले. दहा दिवसांचा पर्युषण उत्सव दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बाल गोपाळांसाठी पाठशाळेचे आयोजन पं. पुनीत लाड यांनी केले. तसेच शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप त्याच प्रमाणे शेवटच्या दिवशी जलयात्रा निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन ध. प्रितेश लाड , ध. स्वप्नेश लाड (पुणे) यांच्याद्वारे करण्यात आले. या पालखी मिरवणुकीतुन जगा आणि जगु द्या असा संदेश देण्यात आला व पर्युषण पर्वाची सांगता या पालखी मिरवणुकीने करण्यात आली. मिरवणुकीमध्ये समाजातील युवक, युवती, महिला, पुरुष, लहान मुले सहभागी झाली होती. या वेळी वर्षभरात कळत-नकळत झालेल्या चुकांबद्दल परस्परांची क्षमा मागून उत्सव साजरा करण्यात आला. उत्सव दरम्यान डॉ.मिलिंद डहाळे, अर्चना बन्नोरे, जैनेंद्र जैन रंजना महाजन, सुयश डहाळे, पुनीत लाड, प्रथम जैन, मयंक जैन, रौनक जैन, सौरभ डहाळे, आयुष जैन, अर्णव जैन, प्रथम जैन यांसह शहरातील जैन युवा मंच, युवक मंडळ व महिला मंडळाने सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष राहुल जैन, श्रेयान्स जैन, प्रतीक जैन, निकेत जैन, सावन जैन, सुजित जैन, प्रफुल्ल जैन, विनोद जैन, राजेश डहाळे आदींनी परिश्रम घेतले.