पाचोरा : महिलेच्या गळ्यातील 15 ग्रॅम सोन्याची पोत लांबवली,

पाचोरा : महिलेच्या गळ्यातील 15 ग्रॅम सोन्याची पोत लांबवली, बस मध्ये चढत असताना महिलेच्या गळ्यातील 15 ग्रॅम सोन्याची पोत चोरीस गेल्याची घटना दिनांक 3 ऑगस्ट शनिवारी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास पाचोरा बसस्थानकावर घडली असल्याची माहिती आज दिनांक 4 ऑगस्ट रविवार रोजी सकाळी 9 वाजता हाती आली आहे. भिकूबाई परदेशी राहणार गाळण ही महिला शनिवारी दुपारी 2:30 च्या सुमारास पाचोरा-गाळण बसमध्ये पाचोऱ्याहून गाळण येथे जाण्यासाठी चढत होती. याचवेळी महिलेच्या गळ्यातील 15 ग्रॅम सोन्याची पोत अज्ञात महिलेने लांबवली आहे. या महिलेने आरडाओरड केली असता पोत चोरून नेणारी महिला बेपत्ता झाली. याबाबत या महिलेने पाचोरा पोलिसात तक्रार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दाखल केली आहे.

















Leave a Reply