रिपोटर : प्रभाकर सरोदे
भडगांव ! 21 तोफांच्या सलामीने जवानावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार…..
वाडे येथे समाधान महाजन या शहिद जवानावर शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार. भारतमातेच्या जयघोषाने परीसर दुमदुमला. सुट्टी भोगुन पुन्हा सेवेत रुजु होण्यासाठी जात असतांना तालुक्यातील वाडे येथील जवान समाधान सखाराम महाजन वय २३ वर्ष याचा रेल्वे अपघातात मृत्यु झाल्याची घटना घडली होती. वाडे गावात दि. २६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जवानाचे पार्थीव पोहताच सजविलेल्या वाहनावरुन गावातुन डीजेच्या तालावर वाजत गाजत भारत मातेच्या घोषणा देत गावातुन मिरवणुक काढण्यात आली. यावेळी नागरीक, महिला, तरुण मंडळी, आजी माजी सैनिक मोठया संख्येने सहभागी होते. या शहिद जवानावर वाडे येथे दुपारी २.३० वाजेच्या सुमारास शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यंसस्कार करण्यात आले. यावेळी शहिद जवानाला त्यांचा पुतण्या प्रसाद रामकृष्ण माळी वय ५ वर्ष हा चिमुकल्या बालकाच्या हस्ते अग्नीडाग देण्यात आला. अंत्ययाञेस नागरीक, महिला , तरुण मंडळी, माध्यमिक विदयालयाचे विदयार्थी, विदयार्थीनी, लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, आजी, माजी सैनिक संघटना पदाधिकारी आदिंची मोठया संख्येने उपस्थिती होती. भारत मातेच्या घोषणांनी संपुर्ण परीसर दुमदुमला होता. याबाबत माहिती अशी कि, समाधान सखाराम महाजन वय २३ वर्ष हे ४० आर जे एन के पुंछ येथे आर्मीमध्ये पोष्टींगर कार्यरत होते. ते वाडे येथे एका महिन्याच्या सुटीवर घरी आलेले होते. सुट्टी उपभोगुन कर्तव्यावर हजर होणेकामी परतीचा प्रवास करत असतांना मालपुर, आग्राजवळ रेल्वे अपघातात दि. २३ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या त्यांचा मृत्यु झाला होता. या जवानाचे पार्थीव दि. २५ रोजी गुरुवारी दिल्लीहुन औरंगाबाद येथे विमानाने आणण्यात आले होते. तर दि. २६ रोजी सकाळी औरंगाबादहुन वाडे येथे जवानाचे पार्थीव साडेअकरा वाजेच्या सुमारास आणण्यात आले. जवानाच्या घरी पार्थीव आणल्यानंतर जवानाच्या आई, वडील, पत्नी, काका, काकु यांच्यासह नातेवाईक मंडळींनी आक्रोश करीत एकच टाहो फोडला. यावेळी घरीही पोलीस व नाशिक आर्मी गार्ड यांनीही जवानास सलामी दिली. तेथुन सजविलेल्या वाहनावरुन या शहिद जवानाची वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली. गावात शहिद जवानाचे डीजीटल बॅनर झळकत होते. गावात व स्टँड परीसरात रस्त्यांवर आकर्षक रांगोळया काढण्यात आल्या होत्या. मिरवणुकीत तीनशे मिटरचा तिंरगा आकर्षण ठरला. तिरंगा विदयालयाच्या विदयार्थी, विदयार्थीनींनी हातात धरुन मिरवणुक निघाली. डीजेवर देशभक्ती गितांनी परीसर दुमदुमला होता. यात ए मेरे वतन के लोगो, तेरा जलवा जलवा, तेरा जलवा, घर कब आओगे, देशभक्ती गितांनी परीसर दुमदुमला होता. त्यानंतर गावालगत प्लाॅट भागात या शहिद जवानावर शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नाशिक आर्मी गार्ड, पोलीस गार्ड आदिंनी जवानाला मानवंदना दिली. यावेळी आमदार किशोर पाटील, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, संजय पाटील, राजेंद्र परदेशी, शिवसेना भिमसेना तालुकाप्रमुख शैलेश मोरे, दक्षता व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, मच्छिंद्र शार्दुल, समाधान पाटील फौजी कोठली, भाजपाचे पाचोरा अध्यक्ष अमोल पाटील, भडगाव भाजपाचे तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील, उपाध्यक्ष रतिलाल पाटील, उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी, दक्षता महिला विभागाच्या अध्यक्षा योजना पाटील, आदी उपस्तित होते.