आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम सुरू न केल्यास आमरण उपोषण करणार ग्रामस्थ नगीना पिंपळगाव यांचा इशारा.
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर.
मोजे नगीना पिंपळगाव या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र गेल्या चार महिन्यापासून मंजूर झालेले आहे व त्याचे उद्घाटनही झालेले आहे परंतु अद्याप कुठल्याही प्रकारचे बांधकाम त्या ठिकाणी सुरू न झाल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झालेले आहे त्यामुळे गावकरी मंडळींसह जिल्हा परिषद सीईओ संभाजीनगर यांच्या दालनासमोर दिनांक 10 सात 2024 बुधवारपासून आमरण उपोषण सुरू करणार आहे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ शालेय समिती अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सदस्य आणि तंटामुक्ती अध्यक्ष व समस्त ग्रामस्थ गावकऱ्यांसोबत घेऊन आमरण उपोषणास बसणार आहे असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ सिताराम त्रिभुवन यांनी दिला आहे यावेळी उपस्थित बाबासाहेब वाळुंज उपसरपंच सिद्धार्थ त्रिभुवन प्रल्हाद रामभाऊ मते बाबासाहेब चंद्रकांत तागड गोरख रामभाऊ आहेर राधाकिसन गजानन खवले दत्तात्रय रामभाऊ गायकवाड रावसाहेब विठ्ठल सावंत सतीश चंद्रकांत तागड शेख सलीम छोटूभाई पुरुषोत्तम साळुंखे उपस्थित होते