आस्था सामाजिक संस्था आणि लायन्स क्लबच्या सोलापूर वतीने भांबेवाडी आणि हिंगणी गावातील 100 निराधारांना चादर सतरंजी, ब्लॅंकेट वाटप
सोलापूर प्रतिनिधी संतोष दलभंजन
गरीब नागरिकांना पांघरून घालणं हीच खरी माणुसकी लायन्स क्लब माजी अध्यक्ष गोविंद लाहोटी

सोलापूर प्रतिनिधी
गेल्या पंधरा दिवसापासून थंडीचा कडाका वाढला आहे अशा या थंडीमध्ये ग्रामीण भागातील नागरिक कुडकुडत आहे सर्वसामान्य गरीब निराधार नागरिकांना घरामध्ये मुबलक पांघरून नसते अश्या व्यक्तीचा चादर आणि सतरंजी देऊन त्यांना मायेची उब देणे गरिबांना मदतीचा हात देणं हीच खरी माणुसकी आहे असे मत लायन्स क्लबचे माझे अध्यक्ष गोविंद लाहोटी यांनी व्यक्त केले.
आस्था सामाजिक संस्था व लायन्स प्रांत 3234 डी वन सर्विस ट्रस्ट व इतर लायन्स क्लब सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने
मोहोळ तालुक्यातील भांबेवाडी व हिंगणी गावामध्ये गरीब ,बेघर ,निराधार ,100 नागरिकांना आस्था सामाजिक संस्था आणि लायन्स क्लबच्या सोलापूर यांच्या वतीने चादर, सतरंजी, ब्लँकेट वाटप करण्यात आले. यावेळी गोविंद लाहोटी हे बोलत होते.
मोहोळ तालुक्यातील भांबेवाडी आणि हिंगणी या गावातील 50 निराधार गरीब एकल नागरिकांना आस्था सामाजिक संस्था आणि लाईन्स क्लब च्या वतीने लॉयन गोविंद लाहोटी आणि लायन्स क्लब नूतन अध्यक्ष नंदा लाहोटी, आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांच्या हस्ते चादर आणि सतरंजीचे वाटप करण्यात आले.
यावेळी आस्था सामाजिक संस्थेचे संचालक योगेश कुंदुर आस्था सामाजिक संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे वेदांत तालिकोटी, अथर्व शिंदे वेदांत तमशेट्टी पिंटू कस्तुरे, सुरज छंचुरे
आधी जण उपस्थित होते.
यावेळी भांबेवाडी गावातील सरपंच केशव वाकचौरे मोहोळ तालुका पंचायत समिती सदस्य रामराजे कदम, हनुमंत घोडके, विजय आरेकर, माझी सैनिक आरेकर हिंगणी गावामधील बापूसाहेब ताकमोगे, माजी सरपंच झेंडगे, व ग्रामस्थ उपस्थित होते.
हे चादर, सतरंजी, लायन्स प्रांत 3234 डी वन सर्विस ट्रस्ट व इतर लायन्स क्लब सोलापूरचे राजेंद्र शहा व हे ब्लॅंकेट राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अध्यक्षिका भाग्यश्री जाधव पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखान्याचे मुख्य अधिकारी डॉक्टर राजलक्ष्मी गायकवाड यांच्या वतीने उपक्रमासाठी सहकार्य केले

















Leave a Reply