भारतीय किसान युनियनच्या नांदेड जिल्हा प्रभारी पदी सुभाष शिंदे पाटील यांची निवड

लोहा (प्रतिनिधी): भारतीय किसान युनियन महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आयोजित ‘शेतकरी संवाद दौऱ्या’निमित्त डेरला (ता. लोहा) येथे विशेष बैठक आणि गावकरी संवाद मेळावा पार पडला. याप्रसंगी संघटनेच्या कामाचा विस्तार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सुभाष शिंदे पाटील यांची भारतीय किसान युनियनच्या नांदेड जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली.
शेतकरी समस्यांवर सविस्तर चर्चा

या संवाद दौऱ्यादरम्यान डेरला आणि परिसरातील शेतकऱ्यांशी थेट चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर ऊहापोह झाला:
विष्णुपुरी जलाशयाच्या शेतकरी पाणी प्रश्न ,रेल्वे भूमी अधिग्रहण ,अवेळी पाऊस आणि पिकांच्या नुकसानीची थकीत भरपाई.
शेतीपंपांचा वीज पुरवठा आणि वाढीव वीज बिले.
शेतमालाला मिळणारा हमीभाव आणि बाजारपेठेतील अडचणी.
नूतन निवडीचे स्वागत

सुभाष शिंदे पाटील यांची नियुक्ती जाहीर होताच उपस्थित शेतकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी भारतीय किसान युनियन सदैव तत्पर राहील. जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडवण्याला माझे पहिले प्राधान्य असेल,” असा निर्धार निवडीनंतर सुभाष शिंदे पाटील यांनी व्यक्त केला.
या बैठकीला भारतीय किसान युनियनचे प्रदेशातील पदाधिकारी, लोहा तालुक्यातील शेतकरी बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीमुळे नांदेड जिल्ह्यात संघटनेची ताकद वाढणार असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना नवीन नेतृत्व मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.


















Leave a Reply