एम एस इ बी च्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा मृत्यू….. वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर

वैजापूर शहरात आज दिनांक 16 1 2026 रोजी विद्युत वाहिनीचे दुरुस्ती संदर्भात सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लाईनचे परमिट घेतलेले होते तसेच एम एस ई बी च्या मार्फत सर्वांना मेसेज देखील केलेले होते की या काळात लाईट बंद असणार आहे परंतु दुपारच्या सुमारास बीएसएनएल ऑफिस रोडवर बाजूला व भूमी अभिलेख कार्यालयाच्या समोर डीपीचे दुरुस्तीचे काम सुरू असताना वायरमन यांना अचानक करंट लागल्याने ते जागेवरच मृत्युमुखी पडले.
कंत्राटी झिरो वायरमन सोमनाथ आसाराम पानडघळे वय वर्ष 29 राहणार अघुर तालुका वैजापूर असे या तरुणाचे नाव आहे तत्काळ या तरुणाला एम एस ई बी च्या कर्मचारी व नगरपालिकेचे कर्मचारी यांनी तत्काळ डीपी वर चढून मृतमुखी पडलेला वायरमन यांना खाली घेऊन तत्काळ वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले

वैजापूर शहरात कुठेच लाईट नव्हती परंतु करंट आला कुठून याची सर्वांनाच धक्का बसला सर्वत्र परमिट घेऊन मगच कामकाज चालू झालेले होते परंतु अचानक करंट लागल्यामुळे एम एस ई बी चे कर्मचारी व इंजिनिअर यांची पळापळ सुरू होती मात्र बीएसएनएलच्या जनरेटर चालू झाल्यामुळे रिटर्न सप्लाय आल्याचे बोलले जात आहे व त्यामुळे एम एस ई बी च्या कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला मात्र ही चूक कोणाची….
नागरिकांनी तत्काळ एम एस सी बी च्या अधिकाऱ्यांना ज्या विचारणा केली मात्र कुठल्याही प्रकारचे उत्तर समोर आलेले नाही



















Leave a Reply