भडगांव ब्रेकिंग : धक्कादायक! भडगाव तालुक्यातील पोलीस जवान शहीद.
भडगाव : तालुक्यातील पांढरद मुळ गाव असलेले पोलीस वैभव सुनील वाघ हे एसडीआरएफ पथकातील प्रवरा नदीत बचाव कार्याची कामगिरी करत असताना भोवऱ्यात अडकून अचानक त्यांची बोट उलटल्याने ते शहीद झाल्याची माहिती आज दिनांक 23 मे रोजी बुधवार रोजी दुपारी 1 वाजता हाती आली आहे. प्रवरा नदीत बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी आलेल्या एसडीआरएफ पथकाची बोट उलटली. या अपघातामध्ये एसडीआरएफ पथकातील तिघा जवानांचा मृत्यू झाला. अकोले तालुक्यातील सुगाव गावा जवळ ही घटना घडली. या घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दिनांक 22 मे रोजी दोन तरुण प्रवरा नदीत बुडाले. त्यातील एकाचा मृतदेह सापडला. तर, दुसऱ्याचा शोध सुरु होता. बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफ पथकाला बोलवण्यात आले होते. बुडालेल्या तरुणाचा शोध घेताना एसडीआरएफ पथकाची बोट उलटली. मात्र बोट उलटल्याने पथकातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पथकात असेल्या इतर दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, यात पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, मुक्काम पोस्ट कौठडी, तालुका दौंड जिल्हा पुणे. वैभव सुनील वाघ मुक्काम पांढरद,पोस्ट पिचरडे, तालुका भडगाव. पोलीस शिपाई राहुल गोपीचंद पावरा, धुळे हे सकाळी सहा वाजता घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य करते वेळी बोट पाण्याच्या भोवऱ्यात अडकल्याने बोट उलटून तिघही जखमी झाले असतात त्यांना हरिचंद्र बावनकुळे हॉस्पिटल अकोले येथे उपचारार्थ दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. यात तिघे मयत झाली आहेत. अशी माहिती राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे यांकडून मिळाली आहे. सर्व शहीद मृतात्म्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे च्या परिसरात श्रद्धांजली वाहून त्यानंतर त्यांचे कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.