Advertisement

ब्रम्हचारी राजुलमती दिंगबर जैन श्राविका आश्रमाच्या वतीने आस्था सामाजिक संस्थेस स्वयंपाक उपयोगी साहित्याची भेट

ब्रम्हचारी राजुलमती दिंगबर जैन श्राविका आश्रमाच्या वतीने आस्था सामाजिक संस्थेस स्वयंपाक उपयोगी साहित्याची भेट

सोलापूर श्राविका संस्था नगर येथील ब्र.राजुलमती माताजी दिंगबर जैन श्राविका आश्रम गेल्या 50 वर्षांपेक्षा अधिक काळापासून चालू होती. या आश्रमात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुली, विधवा, परित्यक्ता महिलांना अल्पदरात भोजनाची व राहण्याची व्यवस्था केली जात होती.या आश्रमातील दैनंदिन स्वयंपाक उपयोगी शेंगडी,मोठे भांडे, कुकर, स्टील टाकी, फ्रीज, असे बाजारनूसार 30000 रुपयांचे भांडे दान स्वरूपात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या आस्था सामाजिक संस्थेला मोफत दिले.
आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने दिलेल्या साहित्यांचा हृदयपूर्वक स्वीकार करून स्वयंपाक उपयोगी साहित्य भेट दिल्याबद्दल श्राविका आश्रमाचे ऋण व्यक्त केले.
तसेच यासाठी श्राविका संस्थेचे सचिव यतीन शहा, विश्वस्त करण शहा, विश्वस्त अंजली शहा, विश्वस्त देवई शहा, वरिष्ठ दिप्ती शहा सर्व विश्वस्त यांचे आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी, प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे यांनी ऋण व्यक्त केले

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!