Advertisement

आत्मकल्याणाचा मार्ग म्हणजे ध्यानधारणा – वीर सागर महाराजांचे मार्गदर्शन

आत्मकल्याणाचा मार्ग म्हणजे ध्यानधारणा – वीर सागर महाराजांचे मार्गदर्शन

सोलापूर प्रतिनिधी संतोष दलभंजन

दि. 04 एप्रिल 2026 वार – शनिवार रोजी श्राविका संस्था सोलापूर येथे पूज्य 108 वीरसागर महाराज यांच्या सान्निध्यात आयोजित करण्यात आलेले ध्यान शिबिर अत्यंत आनंददायी व उत्साही वातावरणात संपन्न झाले.
या ध्यान शिबिरात मोठ्या संख्येने श्रावक-श्राविका बांधवांनी सहभाग घेतला. तसेच या शिबिरास श्राविका संस्थेतील सचिव देवई शहा, वरिष्ट दीप्ती, शहा, मुख्याध्यापक सुकुमार मोहळे, राखी देशमाने, स्वाती कांबळे उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित पर्यवेक्षक पोळ सर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरादरम्यान महाराजांनी ध्यान, साधना व आत्मशुद्धी यांचे महत्त्व पटवून दिले. तसेच दैनंदिन जीवनात शांतता, संयम आणि सकारात्मकता कशी वाढवावी याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी मन:शांतीचा अनुभव घेतला आणि अध्यात्मिक ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त केली. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. आचार्य श्रींनी सर्वांना ध्यान म्हणजे केवळ डोळे मिटून बसणे नाही, तर मनाची शुद्धी आणि आत्म्याशी एकरूप होणे होय. मनात येणारे वाईट विचार, क्रोध, लोभ, मोह यांपासून दूर राहून शांत, संयमी आणि जागरूक राहणे हेच खरे ध्यान आहे. महाराज सांगतात की, बाह्य सुख तात्पुरते असते पण ध्यानातून मिळणारी आत्मशांती कायमची असते. नियमित ध्यान केल्याने मन स्थिर होते, निर्णयक्षमता वाढते आणि जीवनात सकारात्मक बदल घडतो. तसेच त्यांनी अहिंसा, सत्य आणि संयम या तत्त्वांवर चालण्याचा संदेश दिला आहे. ध्यानधारणा ही आत्मकल्याणाचा सर्वोत्तम मार्ग असून प्रत्येकाने रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढून ध्यान करावे असे त्यांनी सांगितले. शेवटी सर्व उपस्थितांनी अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन भविष्यातही करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ऋषभ सोनटक्के, गुरुवंदना सौ प्रगती गांधी, मयुरी सोनटक्के, ऑनलाइन शंका समाधान प्रश्न वाचन श्री पराग शहा सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुकुमार वारे, अनुप कस्तुरे , प्रविण शहा,प्रदीप डेरे, रोहन शहा, सुरज व्हसाळे, सुहास छचुरे, अरिहंत माणिकशेट्टी, अभिनंदन उपाध्ये, अभिजीत पाटील, अनंत बेळ्ळे, प्रवीण कंदले तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगदान दिले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!