Advertisement

अशोक कामटे विचारमंच मंचचे तर्फे शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग,सुखदेव,राजगुरू या विरांना स्मरण करून विनम्र अभिवादन करण्यात आले

अशोक कामटे विचारमंच मंचचे तर्फे शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग,सुखदेव,राजगुरू या विरांना स्मरण करून विनम्र अभिवादन करण्यात आले

सोलापूर प्रतिनिधी संतोष दलभंजन

आज दिनांक 23 मार्च रोजी तुळतापुरवेस बलिदान चौक या ठिकाणी शहीद अशोक कामटे विचारमंच तर्फे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वःताच्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद भगतसिंग,राजगुरू, सुखदेव यांच्या स्मरणार्थ देशभरात शहीद दिवस साजरा केला जातो. 23 मार्च रोजी इंग्रजांनी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या भारत मातीच्या वीर जवानांना फाशी दिली होती त्यांच्या या बलिदानामुळे भारतीय स्वातंत्र आणायला लढ्याला नवीन दिशा मिळाली त्यामुळे आजचा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो.

या प्रसंगी बलिदान चौक या ठिकाणी नगरसेवक विनायक विटकर यांच्या हस्ते शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू या विरांना स्मरण करून पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहीद अशोक कामटे विचारमंच मंचचे अध्यक्ष योगेश कुंदुर, आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी,MSEB चे अधिकारी विलास कोले, आस्था सामाजिक संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे,दिपक उपळकर, व्यास, गिरीष विजापुरे, विकास कुंदुर,मुद्दसर तांबोळी, संतोष गायकवाड, काशिनाथ क्षिरसीकर, राजू पालकर, गणेश बद्दूरकर, अशोक वाडेकर, तात्या भंडारे, आदी देशभक्त, उपस्थित होते..
या प्रसंगी भारत माता की जय, वंदे मातरम्, ईनक्लाब जिंदाबाद, अमर रहे अमर रहे या घोषणा देण्यात आले.
फोटो ओळ. अशोक कामटे विचारमंच तर्फे 23 मार्च बलिदान चौक या ठिकाणी शहीद दिवस विनम्र अभिवादन करताना नगरसेवक विनायक विटकर, योगेश कुंदुर आनंद तालिकोटी, सुहास छंचुरे, विलास कोले, सुशीलकुमार व्यास, उपस्थित होते

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!