आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या निमित्ताने 100 वंचित, बेघर निराधार यांना पुरणपोळी मोफत जेवण वाटप करण्यात आले
सोलापूर प्रतिनिधी संतोष दलभंजन

आज दिनांक 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे जो चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो.हा दिवस मराठी नववर्षाच्या सुरुवात मानलो जातो गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या निमित्ताने आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने सोलापूरातील 100 वंचित, बेघर, निराधार गरिबांना मोफत पुरणपोळी तुप, सारं,भात, पापडी, भजी इत्यादी अन्नदान करण्यात आले आस्था सामाजिक संस्था गेल्या दहा वर्षांपासून मोफत अन्नदान करत असते तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात.
आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की अन्न दान म्हणजे अन्न देणे जे एक महत्वाचे दान मानले जाते हिंदू धर्मात अन्नदानाला विशेष महत्त्व आहे कारण अन्न हे जीवनाचे मुलभूत आवश्यकता आहे अन्नदानाने आपले पुण्य वाढते अन्नदानाने आपल्याला आंतरिक शांती आणि समाजसेवी ची भावना निर्माण होते आस्था सामाजिक संस्थेचे ब्रीदवाक्य कुठेही कोणीही कधीही उपाशी राहू नये आणि सामाजिक बांधिलकी व समाजाचं ऋण फेडण्यासाठी नेहमीच संस्था अनेक उपक्रम राबवत असते तरी सोलापूरात कोणतीही कार्यक्रम मध्ये अन्न शिल्लक राहिल्यास आमच्या आस्था सामाजिक संस्थेशी संपर्क साधावा.
या अन्नदान वाटप प्रसंगी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी, प्रसिद्ध प्रमुख सुहास छंचुरे, संचालक योगेश कुंदुर, महेश नागणसुरे, पिंटू कस्तुरे, सुरज छंचुरे, वेदांत तालिकोटी उपस्थित होते

















Leave a Reply