राज्यस्तरीय ज्युनियर बाॅल बॅडमिंटन स्पर्धेत पुणे महानगरपालिका विजयी व उपविजेतेपद हिंगोली
सोलापूर प्रतिनिधी संतोष दलभंजन

सोलापूर शहर व जिल्हा बाॅल बॅडमिंटन असोसिएशन व श्री सुशीलकुमार शिंदे काॅलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन नेहरूनगर सोलापूर याच्या संयुक्त विद्यमानाने व द महाराष्ट्र बाॅल बॅडमिंटन असोसिएशन याच्या मान्यतेने ७० वी ज्युनियर राज्य स्तरीय बाॅल बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 ( मुले ) स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न झाले या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र चव्हाण ( प्राचार्य जय जवान जय किसान सैनिक स्कूल) अतुल ईगळे ( सचिव द महाराष्ट्र राज्य बाॅल बॅडमिंटन ) धोडिराज गोसावी ( कोषाध्यक्ष ) राजेंद्र भांडारकर (उपाध्यक्ष) ,राजशेखर संगार सल्लागार, डाॅ.हरिश काळे प्रकाश भुतडा अध्यक्ष( द सोलापूर बाॅल बॅडमिंटन असो.सोलापूर) राजेद्र माने (सचिव द बॉल बॅडमिंटन असो. सोलापूर) सुहास छंचुरे (सहसचिव द बॉल बॅडमिंटन असो.सोलापूर,) कल्पना एकलंडगे याच्या शुभहस्ते संपन्न झाला
सदर या बॉल बॅडमिंटन स्पर्धेत यश संपादन झालेल्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
सदर या पारितोषिक वितरणासाठी ट्रॉफी सागर शहा ( संस्थापक अध्यक्ष वैभवी सोशल फाउंडेशन) यांच्याकडून देण्यात आले.
सदर या स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातून 300 खेळाडूचा सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातील जिल्हा सचिव गौरव पावडे, शेखनुर, शिवानंद खंगार,मनिष इंगोले, कल्पना फुलसंगे, मंजुषा खापरे,निजामोद्धीन शेख, तुषार देवरे, एकनाथ सुरशे, अभिषेक खैरनार, विजय अवताडे ,सचिन पाटील, सुनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती
या स्पर्धा यशस्वी करण्यात साठी शब्बीर शेख शिवकुमार स्वामी अजित पाटील, शिवानंद सुतार,रविंद्र चव्हाण यांनी काम पाहिले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास छंचुरे यांनी केले तर आभारप्रदर्शन शिवकुमार यांनी आभार मानले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
*प्रथम क्रमांक.पुणे महानगरपालिका
व्दितीय क्रमां. हिंगोली जिल्हा
तृतीय क्रमांक अमरावती जिल्हा
चौथा क्रमांक. अहिल्यानगर जिल्हा
,स्पर्धेतून उत्कृष्ट खेळाडू म्हणून हिंगोली जिल्ह्याचा व्यंकटेश मालवटकर याला एक हजार रुपये रोख व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले सौजन्य महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन सचिव अतुल इंगळे.
सदर या स्पर्धेसाठी निवास व्यवस्था व मैदान व्यवस्था नेहरूनगर बीपीएड कॉलेजचे सुभाष चव्हाण, विवेक चव्हाण, कार्तिक चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांच्या कडून सर्व पंच व जिल्हा सचिव यांना भेटवस्तू देण्यात आले.
फोटो ओळ- राज्यस्तरीय ज्युनियर बाॅल बॅडमिंटन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी प्राचार्य रवींद्र चव्हाण, अतुल ईगळे, राजेंद्र माने,प्रकाश भुतडा धोडिराज गोसावी सुहास छंचुरे शब्बीर शेख, शिवकुमार स्वामी, अजित पाटील शिवानंद सुतार सुनिल पाटील राजेंद्र मंडारकर डाॅ. हरिश काळे


















Leave a Reply