जगदीश जाधव पाटील
जिल्हा प्रतिनिधी नांदेड.
मराठा बांधव आरक्षणासाठी मुंबईत रस्त्यावर तर नांदेडचे पुढारी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मत जोडणीत व्यस्त

मनोज जरांगे पाटील ह्यांच्या नेतृत्वात मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहे, तिथे त्यांच्या मागण्यासाठी आंदोलन सुरु असताना प्रचंड प्रमाणात समाजाच्या लढ्यासाठी सर्व महाराष्ट्रातील बांधव एकवटला असून, नांदेड जिल्ह्यातील बांधव ही पोहचले आहेत तसेच जेवण ,पाणी , रेनकोट हे गावागावातून मुंबई पोहोच केले जात आहेत. पण ह्यात नांदेड जिल्ह्यातील आमदार खासदार हे निवडणूक नियोजनात मत जोडणीत व्यस्त आहेत अशी टीका सर्व स्तरावरून केली जात आहे, समाजाच्या भावना व्यक्त करताना मराठा समाजाने लोक प्रतिनिधींना आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन केले आहे. तसेच सुरू असलेल्या आंदोलनामध्ये कुठल्या प्रकारचे रास्तारोको ,रेलरोको आंदोलन जाहीर केले नसून , अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन करण्यात आले आहे.


















Leave a Reply