अहिल्या नगर जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचारी/अधिकाऱ्यांची वेळेवर उपस्थिती आणि बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्याची मागणी.
प्रतिनिधी राविकुमार शिंदे अहिल्यानगर महाराष्ट्र

अहिल्यानगर:दिपक पाचपुते यांनी जिल्हाधिकारी साहेबांना अर्ज सादर करून ग्रामीण व उपनगर क्षेत्रातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांची वेळेवर उपस्थिती व बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सक्तीची मागणी केली आहे. त्यांच्या याचिकेत म्हटले आहे की, अनेक कार्यालयांमध्ये कामकाजाच्या वेळेत अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित राहतात
ज्यामुळे ग्रामीण नागरिकांना लक्षात आणली आहे. सेवा मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो.
सदर याचिकेत पाचपुते यांनी तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, महसूल सहाय्यक, ग्रामसेवक, पंचायत समिती कर्मचारी, जिल्हा परिषद कार्यालयीन कर्मचारी, आरोग्य सेवक, आशा वर्कर्स, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका आणि इतर संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती विविध वेळा लक्षात आणली आहे
सर्व संबंधित विभागांसाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करून, कार्यालयीन वेळांमध्ये नियमित उपस्थिती राखणे अनिवार्य करण्याची विनंती पाचपुते यांनी केली आहे. तसेच, बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू न करणाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई होईल, असे सूचित केले आहे.
पाचपुते यांच्या अर्जात, महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६४, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, करावी.१९७९, राज्य सरकारी कर्मचारी (शिस्त व अपील) नियम, १९७९, महाराष्ट्र नगरपालिका सेवा (शिस्त व अपील) नियम, १९८१ आणि इतर संबंधित नियमांचा आधार घेतला आहे.
पाचपुते यांनी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली आहे की, संपूर्ण जिल्ह्यात बायोमेट्रिक हजेरी प्रणाली अनिवार्य करावी, तसेच कार्यालयीन शिस्त राखण्यासाठी आणि कार्यक्षमतेसाठी आवश्यक ती कारवाई तात्काळ सुरू करावी.


















Leave a Reply