शॉर्टसर्किटमुळे चार एकर ऊसाला लागली आग
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर

वैजापूर तालुक्यातील कापूसवाडगाव या ठिकाणी चार एकर ऊसाला विद्युत तारेच्या शॉर्ट सर्किटमुळे चार एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे
शिवनाथ विठ्ठल निगळ गट क्रमांक 217 राहणार कापूस वाडगाव असे या शेतकऱ्याचे नाव आहे आपल्या शेतामधील विद्युत वाहिनीची चिमणी फुटल्यामुlळे ऊसाला आग लागली होती अचानक धूर दिसल्यामुळे तत्काळ आजूबाजूंच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धावत येऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. व त्यांना त्यात यश आलं. यावेळी लगेच महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन केला असता लगेच महावितरणचे आनंद गवारे साहेब घटनास्थळी दाखल झाले व वीज पुरवठा तत्काळ थांबवण्यात आला. मंडळ महसूल अधिकारी विक्रम वरपे साहेब यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराची पाहणी करून पंचनामा केला.



















Leave a Reply