गणेश धनगर. दिनांक 28/01/2025.
जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. श्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ जळगाव जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधून घेतले. यात प्रामुख्याने चाळीसगाव तालुक्यातील वीज वितरण कंपनीचे बाह्यास्ञोत कामगार नियुक्तीत होणारा भ्रष्टाचार होत असून संबंधित एजन्सीला कार्यारंभ आदेश दिलेल्या अटी पायमल्ली होत असल्याने दिसून आले.प्रादेशीक वनविभाग व वन्यजीव विभागांतर्गत घळी बांध,दगडी बांध, अश्या प्रकारे मंजूर कामाच्या एजन्सी हे DFO व RFO सुचवतात. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल जावळे, आमदार अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद, तसेच संबंधित अधिकारी यांची उपस्थिती होती.