जगदीश जाधव पाटील
जिल्हा प्रतिनिधी
मुळशी येथे भारतीय किसान युनियनची महाराष्ट्रातील पहिल्या शाखा आणि कार्यालयाचे उद्घाटन

प्राचीन शेतकरी महाराजा बळीचे वैचारीक कृतीशील वारस, देशाचे महान सुपुत्र, देशातील शेतकऱ्यांचे कणखर व कर्तव्यकठोर नेतृत्व आदरणीय बाबा महेंद्रसिगं टिकैतजी यांच्या जयंतीनिमित्त आज महाराष्ट्र प्रदेश भारतीय किसान युनियनतर्फे महाराष्ट्रातील पहिल्या गाव शाखेचे आणि मुळशी तालूका कार्यालयाचे पिरंगुट येथे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास अखिल भारतीय जाट महासभा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय शिवजीराम चौधरी, भारतीय किसान युनियन महाराष्ट्र प्रदेश प्रभारी भाई चंद्रशेखर नलावडे-पाटील, प्रदेश महासचिव मावळा रूपाली ताई पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष मोहनदादा गोळे पाटील, मुळशी तालूका अध्यक्ष अजय पवळे, अन्य पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते. याच कार्यक्रमात तालुका पातळीवरील अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.


















Leave a Reply