Advertisement

नवी दिल्ली येथे NEET पेपर फोडीच्या विरोधात इंडिया आघाडीच्या सर्व युवक संघटनांचा एल्गार

सत्यार्थ न्यूज रिपोर्टर- किरण माळी

नवी दिल्ली येथे दिनांक 2 व 3 जुलै 2024* रोजी इंडिया आघाडीच्या सर्व युवक संघटनांची (Indian Youth Front) बैठक संपन्न झाली. यामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन देशातील युवकांकरिता, विद्यार्थ्यांकरिता काम करण्याचे ठरविले. त्यात प्रामुख्याने NEET परीक्षेचा गोंधळ व पेपर फोडीच्या वादात विद्यार्थांना होणाऱ्या त्रासा विरोधात इंडिया युथ फ्रंट आवाज उठवणार आहे !
या बैठकीत *शिवसेना नेते – युवासेना प्रमुख मा.श्री.आदित्यसाहेब ठाकरे* यांच्या मार्गदर्शनात युवासेनेतर्फे *शिवसेना तथा युवासेना सचिव मा.श्री.वरुणजी सरदेसाई साहेब*, युवासेना कार्यकारिणी सदस्य श्री.योगेशजी निमसे, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया सहभागी झाले होते.

दिल्ली येथील *नवीन महाराष्ट्र सदन* येथे श्री.वरूणजी सरदेसाई साहेब यांनी सन्माननिय पत्रकारांसोबत महाराष्ट्रातील विविध विषयांवर चर्चा केली व मुलाखत दिली.

तद्नंतर आपल्या भारत देशासाठी *संविधानाचे व लोकशाहीचे मंदिर* असलेल्या संसद भवनाला भेट दिली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!