Advertisement

वैजापूर-35 वर्षानंतर 14 गावांचा वनवास अखेर संपला 64 कोटींचे कर्ज झाले माफ

http://satyarath.com/

35 वर्षानंतर 14 गावांचा वनवास अखेर संपला 64 कोटींचे कर्ज झाले माफ

प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर

वैजापूर तालुक्यात 14 गावांचा शेत जमिनी वर 64 कोटींचे कर्ज रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना होती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद ने तिच्यावरती कर्ज काढून ही योजना सुरू केलेली होती परंतु काही कारणास्तव ती योजना बंद पडली परंतु शेतकऱ्यांचा सातबारा वरती तो बोजा तसाच होता त्यामुळे बँका शेतकऱ्यांना थांबू देत नव्हत्या कारण की सातबारा वरती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज असल्याकारणाने आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही असे बँक वाले सांगत होते परंतु आता आमदार रमेश बोरनारे सर यांनी मुख्यमंत्र्यांकडे सतत केलेला पाठपुराव्याला अखेर यश आले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व महाविकास आघाडी सरकार यांच्या मुळे हे कर्ज माफ होऊ शकले.
आज सकाळपासूनच 14 गावांमधील शेतकरी हे आमदार रमेश बोरनारे सर यांच्या मुरारी पार्क येथील कार्यालयात सकाळ पासून रीग लागली होती दुपारी दोन वाजेपर्यंत सत्कार समारंभ व आभार प्रदर्शन चालू होते शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
आज आमच्यासाठी खरोखरच खूप मोठा आनंदाचा दिवस आहे गेल्या 35 वर्षांपासून आमच्या सातबारा वरती सतत असणारा बोजा आमदार रमेश बोरनारे सर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळे आम्हाला खरोखरच खूप मोठा धीर आला आहे आयुष्यभर सुद्धा यांचे उपकार आम्ही कधीच फेडू शकत नाही.
अशोक कराळे शेतकरी.
टाकळी सागज

https://satyarath.com/

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!