वैजापूर तालुक्यात 70 टक्के पेरणी पूर्ण. मात्र पावसाची प्रतीक्षा कायम ?
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
वैजापूर तालुक्यात एक लाख 52 हजार 112 हेक्टर पैकी एक लाख 34 हजार 894 हेक्टर म्हणजेच 70 टक्के पेरणी पूर्ण झाली त्यामध्ये उर्वरित पाऊस कमी असल्यामुळे तीस टक्के पेरणी अजून खोळंबलेली आहे यावर्षी कापसाचे क्षेत्र खूप कमी प्रमाणात आहे तसेच सोयाबीनचे क्षेत्र सुद्धा कमी प्रमाणात आहे मात्र मक्याचे क्षेत्र वाढलेले आहे.
कृषी कार्यालय
वैजापूर
मका पिकाचे उत्पन्न का वाढले?
कापूस पीक हे गेल्या तीन वर्षापासून उत्पन्न निघण्याचे प्रमाण खूपच कमी आहे त्यातल्या त्यात बोंड आळी आली की कार्यक्रम झाला योग्य भाव मिळत नाही आणि शेवटी शेवटी कापूस घरात ठेवला तर त्यातली किडे रोज आमच्या लेकरांना घरच्यांना माणसांना खूप खाज येऊन मोठे मोठे फोड येतात त्या भीतीने सुद्धा आम्ही कपाशी पीक यावर्षी केले नाही
शेतकरी दिगंबर थोरे
गोयगाव
मागील वर्षी मी सोयाबीन पीक केलं होतं परंतु मागील वर्षी सोयाबीनला भावच भेटलेला नाही मागील वर्षाची सोयाबीन आज सात ते आठ क्विंटल आमच्या घरातच पडून आहे आमचे मागील वर्षाचे उत्पन्न काहीच मिळाले नाही त्यामुळे यावर्षी सोयाबीन पीक केलं नाही.
शेतकरी कैलास पाटील हिंगे खंबाळा


















Leave a Reply