सत्यार्थ न्यूज रिपोर्टर- किरण माळी
अकरा वर्षीय मुलीवर इसमाने बलात्कार केल्याची घटना उघड.
जळगाव शहरातील संताप जनक प्रकार
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील एका अकरा वर्षीय मुलीला घरात कोंडून 40 वर्षीय व्यक्तीने तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शहरातील रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत 17 दिवसांनी उघडकीस आली आहे. या संताप जनक प्रकाराबाबत बुधवारी दिनांक 28 रोजी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला मुंबईहून पोलिसांनी अटक केली आहे पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे दिनांक 12 ऑगस्ट रोजी दुपारी चार ते सहा वाजेच्या दरम्यान रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत संशयित आरोपी सिद्धार्थ वानखेडे वय 40 यांच्या मुलासोबत अकरा वर्षाची शेजारी राहणारी मुलगी आणि काही मुलं लपंडावाच्या खेळ खेळत होती. तेव्हा संबंधित मुलगी संशयित आरोपीच्या घरात लपायला गेली होती. त्याच वेळेस सिद्धार्थ वानखेडे हा घरात आला त्याने त्या मुलीला पाहिल्यानंतर घराचा दरवाजा बंद केला तसेच घरातील सर्व लाईट देखील बंद करत मुलीवर अत्याचार केले.
तसेच पीडित मुलीने आरडा ओरड केली. तेव्हा शंशयिता ने मुलीच्या हातावर नखांनी ओरखडले. संशयीताने मुलीचे तोंड दाबून तिला जीवेठार मारण्याची धमकी देत शांत राहण्यात सांगितले. ही माहिती काही दिवसानंतर पीडित मुलीच्या आई-वडिलांना कळल्यानंतर बुधवारी रामानंदनगर पोलीस स्टेशन येथे संबंधितावर भारतीय न्यायसंहिता कलमानुसार 63 बी,65(2)74,76,127(1),351(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी सिद्धार्थ वानखेडे काही दिवसांपासून मुंबईला पडून गेला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला गुरुवारी मुंबईहून अटक केली आहे शुक्रवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी दिली आहे.