आश्चर्य चक्क तीन बिबट्यांनी केला घोड्यावर हल्ला परिसरात भीतीचे वातावरण
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
वैजापूर तालुक्यातील लाडगाव या ठिकाणी दररोज काही ना काही बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे लाडगाव येथील एम एस ई बी च्या जवळ एका मजुराचा घोडा बांधलेला होता परंतु चक्क तीन बिबटे मिळून बिबट्यावर हल्ला केला त्यात तो गेला
सकाळी काही ग्रामस्थांनी बघितले असता त्यांनी तत्काळ वन विभागाला कळविले व पंचनामा करण्यात आला तसेच काशिनाथ रक्ताटे यांच्या घराजवळ बांधलेल्या वासरू सुद्धा बिबट्याने हल्ला चढवला त्यात वासरू गंभीर आहे खूप आवाज झाल्यामुळे शेतकरी आप्पासाहेब रक्ताटे हे झोपेतून उठले असता त्यांनी समोर बघितले तर चक्क तीन बिबटे. मग त्यांच्या लक्षात आले की बिबट्या आले आहे म्हणून. मग ते बिबटे पुढे जाऊन घोड्यावर हल्ला केला अशी माहिती आप्पासाहेब रक्ताटे यांनी दिली.