Advertisement

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान हे महत्त्वाचे- पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान हे महत्त्वाचे- पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव व धरणगाव तालुक्यातील भजनी मंडळांना तीन टप्यात 177 साहित्याचे वाटप !

 

पाळधी / धरणगाव / जळगाव प्रतिनिधी दि.  – पंढरपूरची आषाढीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी 4 हजारापेक्षा भाविक भक्तांना दर्शनाला पाठविता आल्याचे भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभले. पांडुरंगाच्या कृपेने आणि वारकऱ्यांच्या आशीर्वादाने आगामी काळात आम्ही काम करत राहणार असून संत कार्यासाठी सदैव झटत राहणार असून ‘राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान’ हे महत्त्वाचे असते असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. श्रीगुरु मोठे बाबा वारकरी सेवा टस्ट्र आयोजित पाळधी येथील सुगोकी लॉन्सवर आयोजित भजनी मंडळ साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व मित्र परिवाराने केले होते. या अत्यंत शिस्तबद्ध व अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव व जळगाव तालुक्यातील 79 भजनी मंडळांना आज साहित्याचे वाटप करण्यात आले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!