राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब पक्षाच्या वैजापूर अल्पसंख्यांक शहराध्यक्ष पदी जुबेर भाई चाऊस
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
वैजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या शहराध्यक्षपदी वैजापूर शहरांमधील तरुण उद्योजक श्री जुबेर भाई चाऊस यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसद रत्न सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते एकमताने निवड करुन नियुक्ती पत्र देण्यात आले,जुबेर चाऊस हे वैजापूर शहरात सार्वजनिक कार्यक्रमात नेहमी अग्रेसर असतात.शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी ते अत्यंत उत्सुक आहेत. त्यांची शहर अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या नंतर त्यांनी मनोगत व्यक्त केले .त्यांनी वैजापूर शहरातील सर्व तरुण, जेष्ठ नागरिक यांना एकत्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ध्येय, धोरणास बांधिलकी असुन, सर्व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी असलेल्या कार्याबद्दल जनजागृती सुरू केली आहे.लवकच वैजापूर शहरातील सर्व समाजातील तरुणांना ज्येष्ठांना सोबत घेऊन प्रत्येक वार्डात शाखा उभारणीसाठी प्राधान्य देण्यात येईल व बुथ कमिट्या करण्यात येईल.सदर निवडी बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष श्री मंजाहरी पाटील गाढे, सोशल मीडिया जिल्हा कार्याध्यक्ष श्री आर.व्ही. सावंत साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश (बापु) ठुबे, विधानसभा अध्यक्ष श्री राजु(भाऊ)कराळे, राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस तथा सरपंच श्री शरद (भाऊ) बोरणारे, विशाल मतसागर.समाजीक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष रतन पगारे,श्री भगवान आप्पा ठुबे, श्री नज्यु पठाण, अदनान पठाण,मुजिब शेख,सोनु शेख,रजा शेख,समीर शेख,अरबाज शेख,साहिल पठाण, शाहरुख पठाण सह वैजापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन करुन पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.