अखेर गावकऱ्यांच्या प्रयत्नांना यश व सत्यार्थं न्यूज चा इफेक्ट आरोग्य उपकेंद्रांचे बांधकामास सुरुवात
.
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
वैजापूर तालुक्यातील नगीना पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन होऊन बरेच दिवस झाले होते परंतु दवाखान्याचे टेंडर निघून सुद्धा ठेकेदार आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम सुरुवात करीत नव्हता त्या अनुषंगाने ग्रामस्थांच्या वतीने 10 जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद समोर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली होती परंतु जिल्हा परिषद सिओ च्या आदेशाने आम्ही तत्काळ दहा दिवसाच्या आत बांधकामास सुरुवात करत आहोत असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते आणि आज त्याच आरोग्य उपकेंद्राचे शासकीय प्रोटोकॉल नुसार नविन आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन संपन्न झालं यावेळी जिल्हा मूख्य कार्यकारी अधिकारीच येणार होते पण अर्जंट केंद्रीय व्हिडिओ कौंनफरंस मिंटिंग लागल्यामूळे त्यांनी तत्काळ जिल्हा परिषद मूख्य कार्यकारी अभियंता बाधंकाम श्री बनसोडे साहेब ,वैजापूर पंचायत समितीचे बीडीओ श्री वाघचौरे साहेब ,जिल्हा परीषद चे उप कार्यकारी अभियंता वैजापूर श्री पाटील साहेब , उप अभियंता श्री उढान साहेब यांना आदेशीत करून उद्घाटन करून प्रात्यक्षित बांधकाम कोणाच्या ही दबावाला बळी न पडता चालू करा असे आदेशीत केले होते या छोटेखानी सोहळ्याला ग्रामसेवकी सौ भुजाडे मॅडम व संभाजीनगर वरून आलेले प्रमुख अतिथी श्री पप्पू अण्णा ठुबे , दवाखाना चे कर्तेघर्त श्री सिद्धार्थ भाऊ त्रिभुवन व श्री सूधेश मुचक पाटील* तसेच गावातील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व सदस्य मा.सरपंच उपसरपंच व *समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.