Advertisement

ब्रेकिंग पाचोरा! अखेर तरुणाचा मृत्यू….

ब्रेकिंग पाचोरा! अखेर तरुणाचा मृत्यू….

पाचोरा शहरामध्ये कॉलेज चौकात दिनांक 13 जुलै शनिवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास भरधाव अवजड वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली होती. या धडकेमध्ये दुचाकीवरील दोघेही जण गंभीर जखमी झाले होते. यातील गाळण येथील एका तरुणाचा उपचारादरम्यान जळगावात मृत्यू झाला असल्याची माहिती आज दिनांक 14 जुलै रोजी सकाळी 9 वाजता हाती आली आहे. संतोष शिवसिंग परदेशी (वय ३७, रा. गाळण ता. पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. ते मार्केटिंग क्षेत्रातील कंपनीत काम करून यावर कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होता. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. शनिवारी दि. १३ जुलै रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास ते कल्याण स्टेशनवरून पाचोरा रेल्वे स्टेशनवर उतरले. स्टेशनवर उतरल्यावर गाळण येथे घरी जाण्यासाठी त्यांनी एका दुचाकीस्वाराची लिफ्ट मागितली. या दुचाकीस्वाराच्या सोबत जात असताना कॉलेज चौकात आल्यावर भरधाव अवजड वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या जबर धडकेत दोघेही जण गंभीर जखमी झाले होते. यातील संतोष परदेशी यांच्यावर जळगावातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तर दुचाकीस्वार हे कृषी अधिकारी असल्याची माहिती मिळत असून त्यांच्यावर पाचोर्यातीलच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत होती. दरम्यान जळगावात संतोष परदेशी यांचा उपचार सुरू असताना दिनांक 13 रोजी रात्री 7 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला, आज दिनांक 14 जुलै रविवार रोजी दुपारी 1 वाजता त्याचे वर पाचोरा तालुक्यातील गाळण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान घटनेप्रकरणी संतोष परदेशी यांच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पाचोरा पोलीस स्टेशनला करण्याचे काम सुरू होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!