सत्यार्थ न्यूज रिपोर्टर -किरण माळी
येत्या २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर तसेच विदेशातही गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा केला जातो. या अनुषंगाने पाळधी येथील सुगोकी हॉल येथे समितीने 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजन केले आहे त्यानिमित्ताने पाळधी येथील भवानी मातेला नारळ वाढवून प्रचार प्रसार शुभारंभ करण्यात आला समितीचे विनोद शिंदे प्रल्हाद सोनवणे सुभाष पाटील रमेश महाजन शुभम माळी राजेंद्र सोनार मच्छिंद्रनाथ प्रदीप पाटील नाना पाटील व पाळधी ग्रामातील धर्मप्रेमी उपस्थित होते.
आई भवानी मातेला श्रीफळ अर्पण करून ओटी भरून गुरुपौर्णिमा प्रसाराला सुरुवात.