Advertisement

 पाचोरा ब्रेकिंग ! हमरी – तुमरी करत ग्रामसेवकास….

पाचोरा ब्रेकिंग ! हमरी – तुमरी करत ग्रामसेवकास….

 

पाचोरा   पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड गावातील अतिक्रमणाचा वाद चिघळला असून याच अतिक्रमणाच्या विषयावरुन दिनांक 24 जून सोमवार रोजी गावातीलच एक ग्रामस्थ सकाळी 11 वाजेच्या सुमारास ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गेला होता व त्याठिकाणी अतिक्रमणाबाबत सरपंच ग्रामसेवक यांच्याशी चर्चा सुरु असतांनाच शाब्दिक चकमक उडाली व यातूनच संबंधित तक्रारदार व ग्रामसेवक यांच्यात हमरी तुमरी झाली. यावेळी ग्रामसेवक रमेश महाजन बेसावध असल्याने त्या तरुणाने केलेल्या हमरी – तुमरीत व लोटलेल्या दरवाजात ग्रामसेवकाच्या तोंडावर, ओठांवर मार लागला असून हाताचा बोट दरवाजात जोरदार दाबले गेल्याने रक्तप्रवाह सुरु होऊन फ्रॅक्चर झाला आहे. सध्या माझेवर उपचार सुरु असून तबियत सध्या तरी बरी आहे बोट फ्रॅक्चर झाला असल्याची अशी माहिती कुऱ्हाड गावाचे जखमी ग्रामसेवक रमेश महाजन यांनी दिली आहे. तसेच ही घटना घडल्यानंतर कुऱ्हाड खुर्द गावचे सरपंच व संबंधित ग्रामसेवक यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल करण्यासाठीची कारवाई सुरु केली होती. जखमी ग्रामसेवकास वैद्यकीय उपचारांची गरज असल्याने त्यांना पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथून मेमो घेऊन शासकीय रुग्णालयात पाठवले गेले असता, सध्या त्यांचेवर उपचार सुरु आहेत. अशी घटना घडणे निंदनीय असल्याचे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.

अशाच पोस्ट साठी सत्यर्थ न्यूज ला सबसक्रायिब करा बातमी आणी जाहिरात देण्यासाठी संपर्क चेतन सरोदे मो.9960922398

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!