Advertisement

ब्रेकिंग : पाणीपुरी खाल्ल्याने ८० जणांना विषबाधा..

ब्रेकिंग : पाचोरा वासियांनो सावधान, पाणीपुरी खाल्ल्याने ८० जणांना विषबाधा..


चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे सोमवारी दिनांक १७ रोजी संध्याकाळी आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने सुमारे ८० पेक्षा अधिक जणांना विषबाधा झाली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. यात ३० पेक्षा अधिक जणांवर अडावद येथील ग्रामीण रुग्णालयात तर इतरांनी खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेतलेत. कमळगाव आणि आजूबाजूच्या खेड्यांतील तसेच चांदसणी, मितावली, पिंप्री येथील ग्रामस्थ सोमवारी दि. १७ जून रोजी संध्याकाळी बाजारासाठी आले होते. तेथील पाणीपुरी विक्रेत्यांकडून अनेकांनी पाणीपुरी खाल्ली. तर काहींनी पाणीपुरीचे पार्सल घरी नेले होते. पाणीपुरी खाल्लेल्यांना मंगळवारी सकाळी उलट्या, जुलाब, पोटात दुखणे असे त्रास जाणवू लागले. यापैकी अनेक रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. संध्याकाळी ६ वाजेनंतर अचानक रुग्णांमध्ये वाढ झाली. अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रासह अडावद व चोपडा येथील खासगी रुग्णालयांतही अन्नामुळे विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच गेली. यापैकी डिंपल कोळी (१६), आयर्न सपकाळे (७), पवन सोनवणे (१३), निकिता कोळी (१३), चेतना सपकाळे (१९) यांच्यासह ३० जणांना उपजिल्हा रुग्णालय, चोपडा येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. पाणीपुरीमुळे त्रास झाल्याबाबत सोमनाथ जगन कोळी (रा. पिंप्री) यांनी पोलिस स्टेशनला लेखी जबाब दिला आहे. अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात पिंप्री, कमळगाव येथील विषबाधा झालेले सर्वच वयोगटातील रुग्ण वाढतच गेले. या ठिकाणाहून ७० पैकी ३० रुग्ण चोपडा येथे उपजिल्हा रुग्णालयात व इतर रुग्ण खासगी व जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. रात्री सुमारे १० रुग्णांवर अडावद येथे उपचार सुरू होते. घटना समजल्यानंतर चोपडा तालुका गटविकास अधिकारी रमेश वाघ तसेच आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर हे आरोग्य पथकांसह दाखल झाल्यावर उपचारास गती मिळाली. अडावद आरोग्य केंद्रात रुग्णसंख्येत वाढ होताच गावातील ग्रामस्थांनी मदत कार्यासाठी धाव घेतली होती. तसेच पाचोरा शहरात देखील बऱ्याच युवा तरुणी, तरुणांसह, महिलांना पाणीपुरी सह इतरही क्रंची खाद्य खाण्याची आवड असल्याने, सायंकाळी सहा वाजेनंतर चौपाटी सारखी गर्दी पाचोरा शहरात विविध भागांमध्ये पाहावयास मिळते, त्यात मुख्य तो पोलीस लाईन पासून भ डगाव रोड पर्यंतचा संपूर्ण भाग हा खाऊ गल्ली सारखा चमकतो. त्यामुळे पाचोरा वासियांनो देखील ही खबरदारी घेऊन कुठे खावे व कुठे खाणे टाळावे, स्वच्छता बाबतची किती काळजी विक्रेताने घेतली आहे त्याची पडताळणी करूनच आपली व आपल्या परिवाराची काळजी आपण घ्यावी, पावसाच्या सुरुवातीस अशा समस्या उद्भवतातच म्हणून काळजी घ्यावी अन्यथा पाचोरा वासियांना देखील अशा समस्यांना सामोरे जावे लागेलच हे मात्र निश्चितच..

जाहिरात आणी बातमी साठी संपर्क

9960922397

सत्यर्थ न्यूज पाचोरा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!