Advertisement

ब्रेकिंग! मटणाची भाजी त्यात लोखंडी रॉडने बेदम मारहाण.

ब्रेकिंग! मटणाची भाजी त्यात लोखंडी रॉडने बेदम मारहाण.

 ब्रेकिंग :- मटणाची भाजी मागण्याच्या राग येऊन जातीवाचक शिवीगाळ करत मटणाची भाजी बनविणाऱ्या चार जणांकडून वनकोठे येथील तीन जणांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आल्याने कासोदा पोलीस स्टेशन येथे संशयित चारही आरोपिंविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 13 जून 2024 रोजी वनकोठे तालुका एरंडोल येथील राहणारा देवा सपकाळे हे एरंडोल रोडवरील पिरबाबच्या दर्गाजवळ मटनाचा जेवणाचा कार्यक्रमाला गेले असता तेथे पप्पु खाटीक, कालु खाटीक, भु-या खाटीक व एक अनओळखी इसम अशांनी देवा सपकाळे व त्याचे वडीलांना मांगटे तुझे गावमें कम पड़ा क्या तो तु इधर भी मांगने आ गया मांगने असे जातीवाचक बोलुन त्याचे वडीलांना चापटाबुक्यांनी मारहाण केली ती विचारणा करणाऱ्या देवा सपकाळे व त्याचा मोठा भाऊ विक्की यांस लोखंडी रॉडने तसेच लाकडी काठीने मारहाण करून शिवीगाळ व जीवेठार मारण्याची धमकी देवुन चापटाबुक्यांनी मारहाण करण्यात आली, त्यात देवा सपकाळे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दिनांक 16 जून रोजी देवा सपकाळे यांनी उपचारादरम्यान दिलेल्या फिर्यादीवरून कासोदा पोलीस स्टेशन येथे संशयित चारही आरोपिंविरोधात कायदा कलम 323, 324, 504, 506, 34, अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९, ३(१) (एक). अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ , 3(1)(r). अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९, 3(1)(s) प्रमाणे अट्रॉसिटी दाखल करण्यात आलेली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अभयसिंह देशमुख हे करीत आहेत. यासाठी लहुजी शक्ती जळगाव जिल्हा कार्यकर्त्यांना पीडित कुटुंबियांचा फोन आल्यानंतर लहुजी शक्ती सेनेचे कोर कमिटी अध्यक्ष राजूभाऊ गायकवाड, लहुजी शक्ती सेना विनोद भाऊ कांबळे, जळगाव जिल्हा अध्यक्ष आनंदा भाऊ लोखंडे, तसेच सुनील भाऊ पाचुंदे, व योगेश गायकवाड यांनी न्याय मिळवण्याकरिता तसेचॲट्रॉसिटी दाखल होईपर्यंत सहकार्य केले. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यामधील वनकुठे गावातील मातंग समाज कुटुंबावर जातीवादी शिवीगाळ करून जबरी मारहाण करण्यात आली असून सदर पीडित कुटुंबांना जिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले होते तसेच या घटनेची माहिती मिळतात लहुजी शक्ती सेनेचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष विनोद भाऊ कांबळे यांनी तात्काळ लहुजी शक्ती सेनेचे जळगाव जिल्ह्याचे कोर कमिटी अध्यक्ष राजूभाऊ गायकवाड यांना कळविण्यात आले राजूभाऊ गायकवाड यांना याची माहिती मिळताच राजूभाऊ गायकवाड जिल्हा कोरकमिटी अध्यक्ष, आनंदा भाऊ लोखंडे जळगाव जिल्हा अध्यक्ष, पाचुंदे भाऊ, योगेश भाऊ गायकवाड यांनी तात्काळ कासोदा पोलीस स्टेशन येथे भेट देऊन आरोपींवर तात्काळ अट्रॉसिटी एक्ट प्रमाणे तसेच 307 प्रमाणे गुन्हा दाखल करावा व पिडीत परिवाराला न्याय मिळावा यासाठी राजूभाऊ गायकवाड जिल्हा कोरकमिटी अध्यक्ष यांनी एका लढवय्या वाघाची भूमिका घेऊन गुन्हा दाखल करून आणि त्यांना न्याय देऊ अशा प्रकारचे आश्वासन त्यांनी परिवाराला देऊन लहुजी शक्ती सेनेचा स्टाईल मध्ये राजूभाऊ गायकवाड यांनी शेवटी अल्ट्रा सिटी एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला तसेच आरोपींना तात्काळ अटक व्हावी याची देखील मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली. राजूभाऊ गायकवाड यांनी जी भूमिका घेतली आणि परिवाराला न्याय मिळण्यासाठी शेवटपर्यंतची लढाई लढली त्यासाठी सर्वत्र लहुजी शक्ती सेना मध्ये राजूभाऊ गायकवाड

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!