Advertisement

आता नूतन नगरसेविका आणि नगरसेवक होणार अधिक कार्यक्षम; महापालिकेने घेतला पुढाकार; नवनिर्वाचित सदस्यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचा प्रारंभ

महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या विशेष प्रयत्नांतून आयोजन; पहिल्या दिवशी महिला नगरसेवकांचे उत्साहात प्रशिक्षण
प्रतिनिधी सुधीर गोखले

सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कामामध्ये अधिक चांगल्या प्रकारे पारदर्शकता आणि कायदेशीर बाबींची सखोल माहिती नवनिर्वाचित सदस्यांना व्हावी, या उद्देशाने महापालिका आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन आज महापालिकेच्या जिल्हा परिषद समोरील मंगलधाम येथील कार्यालयात करण्यात आले. आज या प्रशिक्षणाचा पहिला दिवस उत्साहात पार पडला. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन आणि दीपप्रज्वलन उपमहापौर गजानन मगदूम आणि उपस्थित महिला नागरसेविकांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाची संकल्पना महापौर धीरज सूर्यवंशी यांची होती. महापौर सूर्यवंशी यांच्या विशेष प्रयत्नांतून नवनिर्वाचित सदस्यांना कायदेशीर आणि प्रशासकीय ज्ञानाची शिदोरी देण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.आज पहिल्या दिवशी महिला नगरसेवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सत्रात तज्ज्ञ प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले. यामध्ये खालील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली: यामध्ये महानगरपालिका अधिनियमांतर्गत सभांचे नियम, इतिवृत्त लेखन, गणसंख्या, सूचना व उपसूचना देण्याची प्रक्रिया यावर सविस्तर चर्चा झाली  तर महापौर, उपमहापौर, सभापती आणि नगरसेवकांचे घटनात्मक अधिकार, कर्तव्ये आणि मर्यादा. यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आणि अतिक्रमण निर्मूलन, प्रशासन व पदाधिकारी-नागरिक यांच्यातील समन्वय. तसेच  महानगरपालिकेचे आर्थिक स्त्रोत आणि उत्पन्न वाढीसाठी उपलब्ध असलेले नवीन पर्याय, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षमीकरण आणि कायदेशीर तरतुदी, अशा विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी बोलताना महापौर धीरज सूर्यवंशी म्हणाले की, “नगरसेवक हा जनतेचा थेट प्रतिनिधी असतो. प्रशासकीय कायदे आणि नियमांचे सखोल ज्ञान असल्यास जनतेची कामे अधिक प्रभावीपणे आणि वेगाने करता येतात. हे प्रशिक्षण केवळ माहिती देणारे नसून ते शहराच्या विकासकामांना गती देणारे ठरेल.” या प्रशिक्षण सत्रात निवृत्त मुख्याधिकारी पत्की, संदीप जाधव, लक्ष्मण लटके आणि  निवृत्त्त अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदुलकर यांनी प्रशिक्षक म्हणून धुरा सांभाळली. याप्रसंगी महापालिका अतिरिक्त आयुक्त  राहुल रोकडे, उपायुक्त, उपायुक्त अश्विनी पाटील व विद्या पाटील आणि महापालिका सचिव सहदेव कावडे, महिला व बालविकास अधिकारी बाबासाहेब माळी, सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे यांच्यासह महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. उद्या, दिनांक ८ जुलै २०२६ रोजी पुरुष नगरसेवकांसाठी याच धर्तीवर प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महापौर धीरज सूर्यवंशी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!