सत्यार्थ न्यूज रिपोर्टर:- किरण माळी
जळगांव महाराष्ट्र
बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
धरणगाव-येथिल बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात शाळेच्या पहिल्याच दिवशी पुष्पगुच्छ ,शालेय पुस्तके देऊन व सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न म्हणून गुळाचा शिरा देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक जीवन पाटील व मुख्याध्यापक एस.एस.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्रसंगी सांस्कृतिक समितीचे सदस्य किरण चव्हाण यांनी शालेय गीत म्हणून मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले.मुलांची 90 टक्के उपस्थितीने शालेय वातावरण उल्लासित होते.स्वागतासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख कैलास माळी यांनी केले.


















Leave a Reply