वैजापूर शहरात भर दिवसा चोरी पंचवीस हजार लंपास
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
वैजापूर शहरात रोज चोरीची घटना खूप घडत आहेत पाठीमागे सराफा दुकान फोडलं नंतर स्वामी समर्थ मंदिरात दानपेटी व नंतर आत्ता लॅब मध्ये चोरी घडल्याची घटना वैजापूर शहरात लाडगाव रोड या ठिकाणी चोरी घडल्याची घटना दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली सागर साळुंखे माऊली पॅथॉलॉजी लॅब हे आपल्या कुटुंबासह लाडगाव रोड वरती राहतात त्यांच्याकडे स्टाफ मनोज संतोष थोरात राहणार लाडगाव रोड वैजापूर व शुभम त्रिभुवन राहणार डवळा असे आहे दिनांक 12 6 24 रोजी मनोज संतोष थोरात हा माऊली लॅबवर काम करत होता व शुभम त्रिभुवन हा आज सुट्टीवर होता दुपारी दीडच्या सुमारास मनोज थोरात हा पेशंटचे सॅम्पल घेण्यासाठी बावचे हॉस्पिटल ला गेला व मालक सागर साळुंखे हे घरामध्ये पाणी बॉटल आणण्यासाठी गेला होता परंतु सागर हा नगरपालिका मधून फोन आल्यानंतर परस्पर कामानिमित्त मागील दरवाज्याने निघून गेला तिथून काम आटोपल्यानंतर परत लॅब मध्ये आले असताना त्यांना ड्रावव्हरचे लॉक तुटलेले दिसले त्यांना लगेच कामगार मनोज यांना बोलावून सांगितली की लवकर ये व आल्यानंतर हा प्रकार काय आहे विचारले असता तो म्हणाला की मी तर आत्ताच आलो मला माहित नाही त्यावेळी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बघितल्यानंतर समजले की चोरी झाली त्यांनी तत्काळ वैजापूर येथील पोलीस स्टेशन गाठले व सविस्तर माहिती पोलिसांना सांगितली की मला डोनेट लॅब वाले येणार होते त्यांना मला पेमेंट करायचे होते म्हणून मी ड्रायव्हर मध्ये पैसे ठेवले होते परंतु स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने ड्रावर तोडून 25 हजार रुपये लंपास झाले त्यामुळे वैजापूर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


















Leave a Reply