जळगाव : लग्नाचे आमिष, शारिरिक संबंध, काढले ते व्हिडिओ…
आधी लग्नाचे आमिष दाखवत व नंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, एकाने ३२ वर्षीय महिलेवर अत्याचार केला. ही संतापजनक घटना जळगाव शहरातील एका भागात २१ मे २०२१ ते २५ मे २०२४ दरम्यानच्या काळात घडली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून गुरूवार, ६ जून रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला. जळगाव शहरातील एका भागात पीडित ३२ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. पीडितेची भुमेश राहणार जळगांव याच्याशी ओळख निर्माण झाली. त्यानंतर भुमेशने पीडितेची लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवले. शिवाय, याचे त्याने व्हिडीओ देखील करून घेतले. त्यानंतर भुमेशने पीडितेला लग्नास नकार दिल्यामुळे पीडितेने त्याच्यासोबत संबंध तोडले. असे असताना भुमेशने पीडितेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी व मारहाण करून बंदुकीचा धाक दाखवत पीडितेला वारंवार अत्याचार केले. ही २१ मे २०२१ ते २५ मे २०२४ दरम्यानच्या काळात घडली. हा प्रकार सहन न झाल्याने पिडीतेने अखेर शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुरूवार, ६ जून रोजी दुपारी १२ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी भुमेश वय २६ रा.जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर ह्या करीत आहे.