भर चौकात सराफाचे दुकान फोडून तीन लाखांचे दागिने लंपास
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
वैजापूर शहरातील जुन्या स्टेट बँक रस्त्यावरील सोने-चांदीचे दुकान फोडून चोरट्यांनी दोन लाख 79 हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली या घटनेमुळे व्यापाऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे पोलिसांच्या माहितीनुसार शहरातील जुनी स्टेट बँक रोड वरील साखरे आप्पा चौकातील महेश शंकरराव बहिरूवाले यांच्या मालकीचे शंकर त्रंबक शेठ बहिरुवले या नावाने सराफाचे दुकान आहे शुक्रवारी संध्याकाळी दुकान बंद करून हे घरी गेले होते मात्र मध्यरात्री चोरट्यांनी दुकान फोडून सोने चांदीचे दागिने लंपास केले ही घटना सकाळी उघडकीस आली पुढील तपास उपनिरीक्षक मनोज पाटील हे करत आहे