सहजीवनाची बांधली रेशीमगाठी
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
सकल मराठा समाज व मराठा सोयरीक संस्था पुणे आयोजित भव्य मोफत मराठा वधु वर परिचय मेळावा आज गंगापूर येथे पांडुरंग लॉन्स या ठिकाणी घेण्यात आले या ठिकाणी बरेच पुरुष व महिला उपस्थित होते यामध्ये फ्रेश उच्चशिक्षित पुनर्विवाह घटस्फोटीत विधवा अनेक परिचय बायोडाटा मिळावे घेण्यात आले ही संस्था अहिल्यानगर चंदन नगर पुणे येथून आहे या ठिकाणी विशेष सहकार्य म्हणून माननीय श्री संजय पांडुरंग सोळंके (संचालक पांडुरंग लॉन्स गंगापूर) माननीय श्री नानासाहेब दानवे सर माननीय श्री मोती भाऊ वाघ( मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष संभाजीनगर) अण्णासाहेब घायवट (तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ वैजापूर) माननीय अँड शिवमती अर्चना राजेंद्र शिंदे ( तालुका अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड वैजापूर) माननीय श्रीमती सुशीला अण्णासाहेब घायवट( जिजाऊ ब्रिगेड वैजापूर) माननीय श्री धनंजय गायकवाड (संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष संभाजीनगर) माननीय श्री गणेश निंबाळकर संभाजी ब्रिगेड वैजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उपस्थित संपन्न झाला