Advertisement

भडगाव:प्रवाशांचा संताप अनावर केले रास्ता रोको…

भडगाव : प्रवाशांचा संताप अनावर केले रास्ता रोको…

सत्यार्थ न्यूस रिपोटर चेतन सरोदे / प्रभाकर सरोदे

  1. एसटी महामंडळाचे असहकार्य तीन तास प्रवासी उन्हात ,महामंडळाकडून मिळालेल्या वागणुकीमुळे प्रवाश्यांमध्ये प्रचंड संताप. एस टी महामंडळाचा भोंगळ कारभार चांगलाच चव्हाट्यावर आला असून संपूर्ण दिवसभर त्या भोंगळ कारभाराची पासर्डी व कजगाव येथे चर्चा झाल्याचे दिसून आल. भडगाव तालुक्यात कजगाव व पासर्डी च्या मध्ये कापूस जिनिंग जवळ आज दिनांक 15 मे बुधवार सकाळी 9 वाजेच्या सुमारास एस. टी. महामंडळाची बस अचानक बंद पडल्याने भर उन्हात प्रवाश्यांना तब्बल तीन तासाहून अधिक वेळ पर्यंत उन्हात बसावे लागले तरी देखील पर्यायी बस ची व्यवस्था एस टी महामंडळ कडून होत नसल्याने हतबल प्रवाश्यांना पुढील प्रवासासाठी जळगाव चांदवळ रस्त्यावर रास्तारोको चा प्रयोग करावा लागला भर रस्त्यात दगड रचून हा रास्ता रोको बस मधील प्रवाशांनी केला होता यामुळे कजगाव परीसरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. स्थानिकांनी व प्रवासींच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार एरंडोल डेपोची गाडी नंबर (एम एच २०बीएल२६५२)पुण्याच्या दिशेने जाणारी एरंडोल पुणे चिंचवड ही बस तांत्रिक कारणामुळे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास कजगाव पासर्डी गावाच्या मध्ये बंद पडली तब्बल तीन तास बस चालूच होत नसल्याने प्रवाश्यांना तब्बल तीन तास उन्हात काढावे लागले अनेक वेळा विनंती करूनही दुसऱ्या बसची व्यवस्था होत नसल्याने मोठी नाराजी व्यक्त करून प्रवाश्यांनी उग्र रूप धारण केले होते त्यात बसचे चालक वाहक व प्रवाश्यांमध्ये प्रचंड शाब्दीत वाद झाला अखेर पाचोऱ्याच्या दिशेकडून येणाऱ्या बसमध्ये संबधीत प्रवाश्यांना बसवल्यानंतर ह्या तीन तास चाललेल्या वादावर पडदा पडला मात्र ह्या सर्व बाबीमुळे एकच चर्चेला उधाण आले होते. दरम्यान बंद पडलेल्या बस बाबत प्रवाश्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करून आम्हाला एस टी महामंडळ कडून सहकार्य मिळाले नसल्याचे प्रवाशींच्या नातेवाईकांनी सांगितले तर अनेकांकडून दुसरे वाहन थांबवले जात नसल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली तसेच संबधित बंद पडलेल्या बस मधील चालक वाहककांनी सांगितले की आम्हाला प्रवाशींनी सहकार्य केले नसून आम्ही दुसऱ्या बसची व्यवस्था करीत होतो मात्र दुसऱ्या बसमध्ये बसण्यास प्रवाशींनी नकार दिला व उलट आमच्यावर शिव्या देऊन अपमानित करण्यात आल्याचा आरोप चालक वाहकांनी केला आहे त्यामुळे प्रवासीं व चालक वाहकांकडून एकमेकांवर आरोप झाल्याचे या निमित्ताने दिसून आले.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!