पाचोरा : भीषण अपघात, महिला जागीच ठार.
रिपोटर चेतन सरोदे /प्रभाकर सरोदे
पाचोरा शहरातील जारगाव चौफुली जवळील A1 काट्यासमोर जळगाव कडून पाचोऱ्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रक खाली सापडून एक महिला जागीचा ठार झाल्याची घटना घडली आहे. पाचोरा शहरातील A1 काट्या समोरी ही घटना आज दिनांक 15 मे बुधवार रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास घडली. सदर महिलेचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आलेला असून महिला ही मनियार समाजातील पाचोरा तालुक्यातील गिरड येथील असून पाचोरा शहरातील नुराणी नगर भागातील अल्ताफ नामक आपल्या मुलास भेटण्यासाठी आल्याची माहिती मिळत आहे. पाचोरा पोलिसांनी घटनेस्थळी तात्काळ धाव घेत वाहन व वाहन चालकास ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे

















Leave a Reply