उद्या पासून HSRP नंबर प्लेट नाही तर भरावा लागणार १००० रु दंड; वाहनधारकांनी अजूनही आपल्या गाडीला नंबर प्लेट अद्ययावत करून घ्यावी; उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे
प्रतिनिधी सुधीर गोखले
उद्या १जुलै पासून HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत संपत असून आता थेट दंडात्मक कारवाई सुरु होणार असून वाहनधारकांनी लवकरात लवकर या नंबर प्लेट बसवून कारवाईची नामुष्की टाळावी असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले आहे. ते म्हणाले सध्या राज्यामध्ये कोटीच्या आसपास वाहनांना अशा HSRP नंबर प्लेट अजूनही बसवल्या गेल्या नाहीत त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. त्याचबरोबर वाहनधारकांची आमच्या विभागाच्या संबंधित इतर कामेही यापुढे होणार नाहीत. शासनाने यापूर्वी मुदतवाढ दिली होती मात्र वाहनधारकांनी या कडे दुर्लक्ष केले आहे. मात्र ३० जून पर्यंत ज्या वाहनधारकांनी या नंबर प्लेट बसवण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली आहे त्या वाहन धारकांवर मात्र कारवाई नाही होणार. असेही त्यांनी नमूद केले. केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम ५० आणि मोटार वाहन अधिनियमातील कलम ७७ अन्वये पोलीस प्रशासन आणि आमच्या विभागातर्फे हि संयुक्त कारवाई होईल किंवा पोलीस प्रशासन स्वतंत्र कारवाई करू शकते.
Leave a Reply