Advertisement

कोयनेच्या नदीपात्रातील गाळ मातीमध्ये आढळली ढोकरा शैलीतील गणेशाची मूर्ती

प्रतिनिधी सुधीर गोखले
यंदा मान्सून चे आगमन म्हणावे असे न झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. त्यातच पावसाने ओढ दिल्याने महाराष्ट्राची भाग्यरेखा समजले जाणारे कोयना धरणातील पाणी साठ्यामध्ये कमालीची घाट झाल्याने विस्थापित झालेली पूर्वीची गवे आणि तेथील जुनी मंदिरे आता उघडी पडली आहेत त्यामध्ये कोयना नदीच्या पात्रातील गाळामध्ये एक ‘ढोकरा’ शैलीतील जुनी ऋषी मुद्रेतील बैठ्या आसनातील एक सुंदर गणेश मूर्ती आढळून आली आहे. हि गणेश मूर्ती ब्राँझ धातूतील आहे. कोयना धरणाची निर्मिती करत असताना १९५० साली भूसंपादन प्रक्रिया सुरु झाली ती १९६१ साली पूर्ण झाली त्यानंतर १९६३ साली धरणाचे काम पूर्ण झाले या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जावळी आणि पाटण तालुक्यातील सुमारे १०५ गांवे विस्थापित झाली. सध्या पावसाने ओढ दिल्याने जलाशय आटला आहे आणि हे विस्थापित वैभव पुन्हा एकदा दृष्टीस पडत आहे. हि गणेश मूर्ती बामणोली गावात आढळली आहे. हि मूर्ती गाळ मातीमध्ये आढळली आहे त्यामुळे कोयनेचा इतिहास हा किती वर्षांपूर्वीपासून आहे याचा पुरातत्व विभागाने शोध घेण्याची आवश्यकता आहे. या मूर्तीचा कालखंड आणि त्याच्या इतर बाबी आभासण्याची गरज आहे. जाणकारांच्या मते ढोकरा हि अत्यंत जुनी आणि वर्षानुवर्षे चालत आलेली धातू ओत कामाची पद्धत आहे.या शैलीमध्ये मेणाचा साचा वापरला जातो. मूर्ती सर्वप्रथम मेणाने हाताने तयार होते. त्यावर मातीचा लेप देऊन ती भाजली जाते. त्यानंतर में वितळवून त्या जागी धातू ओतून मूर्ती तयार होते. या मिळालेल्या मूर्ती वर सुंदर नक्षीकाम आहे अनेक वर्षे पाण्यात आणि गाळमाती मध्ये असून सुद्धा अजूनही चांगल्या स्थिती मध्ये आहे. अशा प्रकारे मूर्ती बनवण्याची कला बिहार किंवा छत्तीसगड सारख्या राज्यामधून आदिवासी समाजात प्रसिद्ध आहे. हि मूर्ती प्राचीन संस्कृतीचा एक ठेवा असेल तर महाराष्ट्रातही असे काम होत असावे याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!