Advertisement

राज्य उत्पादन शुल्क चे अधीक्षक प्रदीप पोटे यांना सहृदय निरोप; उपाधीक्षक दीपक सुपे यांनी दिल्या त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा

प्रतिनिधी सुधीर गोखले

नुकत्याच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सांगली जिल्हा अधीक्षक पदी बीड चे विश्वजित देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली त्याच बरोबर सध्या असलेले अधीक्षक प्रदीप पोटे यांची जळगाव ला बदली झाल्याचे आदेश प्राप्त झाले. गेल्या तीन वर्षांमध्ये या विभागाने मावळते अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक वर्षाचे टार्गेट मोठ्या जोमाने रेकॉर्ड ब्रेक करत पूर्ण केले होते गट वर्षी पेक्षाही वसुलीचे टार्गेट हे अपेक्षेपेक्षा बाकीच्या जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये चांगले झाले होते. त्यांच्या बदलीचे आदेश मिळताच त्यांच्या सहकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी आज त्यांना प्रशासकीय सहृदय निरोप दिला मिरज चे निरीक्षक तथा प्रभारी उपाधीक्षक दीपक सुपे यांनी त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी सांगली मिरज सह सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्याच प्रमाणे देशी विदेशी मद्य विक्रेता असोशिएशन चे राज्य सचिव रामलिंग गुगरी उपस्थित होते. यावेळी आपल्या ,मनोगतामध्ये मावळते अधीक्षक प्रदीप पोटे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मी ज्यावेळी सांगली मध्ये अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळी नवीन आव्हाने आणि जिल्ह्याचा अभ्यास करून माझ्या सहकारी अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन नेहमी एक दिलाने काम केले. आज माझा हा सत्कार पुढील माझ्या कारकिर्दीसाठी लाख मोलाचा आहे. यावेळी उपाधीक्षक दीपक सुपे म्हणाले आज आमचे अधीक्षक प्रदीपजी जरी जळगाव ला बदली होऊन गेले असले तरी एक मित्रत्वाच्या नात्याने त्यांनी सर्वाना आपलेसे केले होते. नेहमी त्यांनी कर्तव्य सर्वश्रेष्ठ मानून आपल्या कामगिरी कडे लक्ष दिले. नेहमी ते कोणताही मोठा निर्णय घेताना सर्व अधिकाऱ्यांना विचारात घेऊन करत असत. पुढील कारकिर्दीसाठी त्यांना आमच्याकडून खूप शुभेच्छा देतो. यावेळी कर्मचाऱ्यांपैकी नामदेव पाटील म्हणाले माझ्या कारकिर्दीमध्ये अधीक्षक पोटे साहेब यांच्या सारखा अधिकारी मी पाहिला नाही अत्यंत मनमिळावू स्वभावाचे हे अधिकारी भविष्यात अधिक उज्वल कामगिरी करोत हि ईश्वरचरणी प्रार्थना. रामलिंग गुजरी म्हणाले कि मद्य विक्रेत्यांना त्यांचा नेहमी चांगला सपोर्ट राहिला आहे. तर मिरज चे दुय्यम अधिकारी अजय लोंढे जयसिंग खुटावळे, लक्ष्मण पवार यांनी आपापल्या मनोगतामध्ये त्यांच्या आठवणी विशद केल्या

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!