रोटरी क्लब व संध्याकाळ कट्ट्याच्या सदस्यांचा मतदान जनजागृतीसाठी अनोखा उपक्रम…..
रिपोटर चेतन सरोदे / प्रभाकर सरोदे
पाचोरा(प्रतिनीधी)— पाचोरा भडगाव तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लबच्या पाचोरा येथिल जेष्ठ सदस्य व संध्याकाळ कट्ट्याचे सदस्य लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांची जनजागृती करण्यासाठी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
पाचोरा रोटरी क्लबचे डाॅक्टर,प्राध्यापक,शिक्षक,व्यापारी आणी वकिल आणी संध्याकाळ कट्ट्याची सदस्य आज १३ मे २०२४ रोजी सकाळी १० वाजता शहरातिल भडगाव रोडवरील साईबाबा मंदिरा पासुन तिरंगा हाती घेउन सर्व सदस्य रॅली काढली असुन ही रॅली एम.एम.महाविद्यालयापर्यंत काढली. देशाच्या लोकशाहीचा हा उत्सव सर्वांनी मोठ्या उत्साहात साजरा करावा हा यामागिल उद्देश आहे.
यावेळी रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉ पंकज शिंदे, सचिव डॉ मुकेश तेली,असिटन्ट गव्हर्नर प्रदीप पाटील ,डॉ पवनसिंग पाटील, शिवाजी शिंदे,राजेश मोर, डॉ घनश्याम चौधरी, शैलेश खंडेलवाल, ऍड योगेश पाटील , पवन अग्रवाल, राजू बोथरा, निलेश कोटेचा, अतुल शिरसमने , नंदू प्रजापत,सचिन बोरसे, यासोबत अनेक सदस्य उपस्थित होते