Advertisement

चाळीसगाव-धक्कादायक! चारित्र्याचा संशयावरून पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड टाकून केला निघृण खून, पळून जात असलेल्या पतीस अटक.

http://satyarath.com/

धक्कादायक! चारित्र्याचा संशयावरून पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड टाकून केला निघृण खून, पळून जात असलेल्या पतीस अटक.

रिपोटर चेतन सरोदे / प्रभाकर सरोदे

चाळीसगाव :- तालुक्यातील रोहिणी येथून एक

धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात दगड टाकून तिचा निघृण खून केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भारताबाई कैलास गायकवाड (३३) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पती कैलास एकनाथ गायकवाड (३८, रा. ओझर, ता. चाळीसगाव) याला पोलिसांनी अटक केली.

चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथील रहिवासी कैलास गायकवाड हा पत्नी भारताबाई हिच्यासोबत कामानिमित्ताने रोहिणी या गावी राहत होता.

दोघांमध्ये किरकोळ कारणावरून नेहमी वाद व्हायचे. इतकेच नाही तर कैलास हा पत्नी भारतबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास देत तिच्यासोबत वाद घालायचा. तसेच तिचा छळ करायचा. दरम्यान ५ एप्रिलला रात्री भारताबाई ही पती कैलास गायकवाड व मुलगी योगिता यांच्यासह घरात झोपली होती. यावेळी कैलासने दगड डोक्यात टाकून भारताबाई हीचा खून केला. यानंतर तो फरार झाला
सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. भारताबाई हिचा भाऊ गणेश माळी याने दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी हे रात्रीच्या गस्तीवर होते. रोहिणी गावात त्यांनी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करीत होते. त्याचवेळी काही तरुणांनी त्यांना या खुनाची माहिती दिली. मारेकरी पती चाळीसगावच्या दिशेने पळाल्याचे सांगताच परदेशी यांनी मुलांना गाडीत बसवून मारेकरी कैलास गायकवाड याचा शोध सुरु केला. तसेच चाळीसगाव पोलिसांच्या डी. बी. पथकाची मदत घेत मारेकरी कैलास गायकवाड याला शोधून ताब्यात घेतले.

https://satyarath.com/

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!